Skip to main content

कंटेंट आणि समुदाय मार्गदर्शकतत्त्वे

Last updated: 20th June 2021

हे कंटेंट आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वे ("मार्गदर्शकतत्त्वे") https://sharechat.com येथे असलेल्या आमच्या वेबसाइटच्या आणि / किंवा शेअरचॅट मोबाईल अॅप्लिकेशनच्या (एकत्रितपणे, "प्लॅटफॉर्म") वापरावर संचालन करतात आणि जे मोहल्ला टेक प्रा. लि. ("शेअरचॅट", "कंपनी", "आम्ही", "आम्हाला" आणि "आमचे"), भारतीय कायद्यानुसार स्थापित एक खाजगी कंपनीद्वारे उपलब्ध करून दिले गेले आहेत.या कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय No.2 26, 27 1st Floor, Sona Towers, Hosur Rd, Krishna Nagar, Industrial Area, Bengaluru, Karnataka 560029 येथे आहे. "तुम्ही" आणि "तुमचे" हे शब्द प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांना संबोधित केलेले आहेत.

हे मार्गदर्शक तत्त्वे, शेअरचॅट वापर अटी, शेअरचॅट गोपनीयता धोरण, आणि शेअरचॅट कुकी धोरण (एकत्रितपणे, "अटी") सह वाचायला आहेत. कृपया लक्षात घ्या की आम्ही वेळोवेळी ही मार्गदर्शक तत्त्वे बदलू शकतो आणि आम्ही तसे करण्याचा अधिकार आरक्षित करतो. सर्वात वर्तमान आवृत्ती येथे नेहमी उपलब्ध आहे.

शेअरचॅट हा जनतेला जोडण्याचा, आपले विचार, आपले मतं आणि भावना जगाशी शेअर करण्याचा प्लॅटफॉर्म आहे.आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि नागरीकांच्या सक्षमीकरणावर विश्वास ठेवून त्यांना नवीन डिजिटल युगात समाजामध्ये स्वतःला व्यक्त करता येण्यासाठी मदत करतो. आमच्या प्लॅटफॉर्मचे वापरकर्ते विविध आणि बहुभाषी आहेत आणि त्यांनी येथे पोस्ट केलेली कंटेंट आणि कमेंट्स त्यांची संस्कृती आणि मत प्रतिबिंबित करतात. येथील समुदायातर्फे सर्वप्रकारचे कंटेंट ग्रहन केले जाते आणि लहानांपासून ते थोरांपर्यंतचे वापरकर्ते या प्लॅटफॉर्मचा नियमित उपभोग घेतात. म्हणून, हे सुनिश्चित करण्यासाठी की आमचे सर्व वापरकर्ते मानक प्रथेचं अनुसरण करतात आणि त्यांच्या स्वत: च्या सुरक्षेसाठी आम्ही काही मार्गदर्शकतत्त्वे आणि प्रतिबंध घातले आहेत.

पोस्ट मार्गदर्शक तत्त्वे:#

आमच्या प्लॅटफॉर्मवर काही प्रकारच्या पोस्टला अनुमती नाही. जर अशाप्रकारच्या पोस्ट्स आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही त्या काढून टाकू शकतो. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणारी कोणतेही कंटेंट आपणास आढळल्यास, आम्ही आपल्याला त्या पोस्टला रिपोर्ट करण्यासाठी प्रोत्साहित करतो. पोस्ट निर्मात्याचा हेतू महत्त्वाचा आहे. आम्ही अस्वस्थता आणू इच्छित असलेल्या, गैरव्यवहाराचा प्रसार किंवा बेकायदेशीर क्रियाकलापांना प्रोत्साहन देणाऱ्या निर्मिती / पोस्टचे स्वागत करीत नाही.

लागू कायद्याचे पालन करणे#

सर्व प्रकारचे कंटेंट, मर्यादेशिवाय समावेश असलेल्या आमच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड केलेल्या, पोस्ट केलेल्या, कमेंट्स केल्या गेलेल्या किंवा शेअर केलेल्या पोस्ट्स, भारतीय संविधानाच्या अंतर्गत, भारतीय दंड संहिता,1860 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 मध्ये अशा कायद्यांनुसार केलेले सर्व नियम व सुधारणांचे पालन केले असावे. लागू कायद्याचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणात आम्ही कायदेशीर अधिकार्यांना सहकार्य करतो.

आपल्या भारत देशाच्या एकता, अखंडता, संरक्षण, सुरक्षितता आणि सार्वभौमत्व आदींना तसेच इतर राष्ट्रांशी असलेल्या आपल्या मैत्रीपूर्ण संबंधांना आणि देशांतर्गत लागू असलेल्या कायद्यांना बाधा पोहोचेल असा कोणताही आशय तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर अपलोड, पोस्ट आणि शेअर करायचा नाहीये. तसेच त्यावर कोणत्याही कमेंट्सही करायच्या नाहीयेत. दुसऱ्या देशांची बदनामी करणाऱ्या, कोणत्याही गुन्ह्यांना चिथावणी देणाऱ्या अथवा गुन्हे तपासणी रोखणाऱ्या असा कोणताही आशय तुम्हाला पोस्ट करायचा नाहीये अथवा त्यात सम्मिलीत व्हायचेही नाहीये.

लक्षात ठेवा, फक्त कायद्याचे पालन करा आणि काहीही करू नका ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो.

नॉन-व्हेज पोस्ट#

अशी कोणतीही पोस्ट जी कोणाला सार्वजनिक किंवा कामाच्या ठिकाणी पहाण्या योग्य नाही तिला नॉन-व्हेज (NV) म्हणून टॅग केले जावे. यात प्रौढ (अडल्ट) विनोद किंवा लैंगिक सूचक पोस्ट्स समाविष्ट आहेत. NV टॅगचा उद्देश प्रौढांसाठी एक स्थान देणे आहे जेथे ते अडल्ट पोस्ट (विनोदीक किंवा मजेशीर रंगाची छटा असलेली) निर्माण आणि शेअर करू शकतात. त्याचा गैरवापर करू नये.प्रौढ (अडल्ट) पोस्ट्स केवळ प्रौढ प्रेक्षकांसाठी आहे. जर आपण त्या पोस्ट्स आपल्या कुटुंबासोबत शेअर करण्या योग्य नसल्यास, त्याला NV टॅग करा! 😉

नग्नता आणि पोर्नोग्राफी#

कलात्मक मूल्य, शैक्षणिक हेतू, जागरूकता, निषेध, विनोद किंवा उपहासात्मक हेतूसाठी तसेच लैंगिक प्रतिमा मर्यादित असलेल्या अशा पोस्टला आम्ही अनुमती देतो.

या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधातील खालील पोस्ट्स आहेत:
अश्लील, लैंगिकरित्या स्पष्ट, अश्लील किंवा नग्न पोस्ट्स किंवा इमेजेस / व्हिडिओ जे खाजगी भाग (लैंगिक अवयव) उघडकीस आणते;
लोकांच्या खासगी अवस्थेतील इमेजेस / व्हिडिओ किंवा लैंगिक किंवा लैंगिक इच्छा किंवा कामुक हेतू असलेले लोक;लैंगिक अत्याचार किंवा बदला हेतू ( रिव्हेंज ) पोर्नोग्राफी;

पाशवीपणा किंवा झूफिलिया;#

कोणत्याही व्यक्तीला शोषण किंवा धमकी देणारी पोस्ट (उदाहरणार्थ, फोन नंबरची यादी किंवा वेश्याव्यावसाय आणि एस्कॉर्ट सेवा प्रोत्साहित करणाऱ्या किंवा विचारणाऱ्या इमेजेस पोस्ट करणे)
बालसंभोग, बाल (चाईल्ड) पोर्नोग्राफी ( चाईल्ड पोर्नोग्राफीची मर्यादा, निर्मिती, प्रसारण किंवा ब्राउजिंगसह); किंवा बलात्कार, सामूहिक बलात्कार आणि विनयभंग यांच्यावरील कंटेंट. अशोभनीय, अनैतिक आशय
अगदी सोपं आहे. अश्लील पोस्ट्स आमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊ नयेत.

त्रास किंवा धमकी देणे#

आपल्याला शुल्लक आणि त्रासदायक वाटणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा परंतु दुसऱ्या व्यक्तीला त्रास किंवा कमी लेखले किंवा कोणाला लाजवत असेलल्या अशा कोणत्याही पोस्टवर रिपोर्ट नक्की करा.

गैरवर्तनाचे किंवा शिव्याशाप देणारे शब्द, इमेजसोबत छेडछाड, दुर्भावनापूर्ण रेकॉर्डिंग, एखाद्याची निंदा करणे, लैंगिक शोषण करणे, एखाद्याचा अपमान अथवा छळवणूक करणे किंवा लैंगिक अनैतिकतेमध्ये गुंतविणे हे सहन केले जाणार नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला जबरदस्ती किंवा ब्लॅकमेल करणे प्रतिबंधित आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपणास त्यांच्या अकांउंटवरून ब्लॉक केले तर दुसऱ्या अकांउंटवरून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका. प्लॅटफॉर्मवर एखाद्याची खोटी माहिती पोस्ट करून त्यांना वैयक्तिक आर्थिक लाभासाठी छळणे अथवा त्यांना काही इजा पोहोचविणे.

परंतु, जर एखाद्या विषयामध्ये वैशिष्ट्यीकृत लोक किंवा त्यांच्याकडे मोठ्या जनसमुदायाची चर्चा झाली असेल तर आपणस आम्ही परवानगी देऊ शकतो.
हा सार्वजनिक प्लॅटफॉर्म आहे . चांगले वागा!

बौद्धिक संपत्ती:#

पेंटिंग्स, पोस्टर, फोटोग्राफ, जाहिराती, कविता, लाईमरिकस, ध्वनी रेकॉर्डिंग, संगीत रचना, व्याख्यान, लेख,टीव्ही सिरीज, चित्रपट, ऑनलाइन व्हिडिओ, व्हिडिओ गेम, संगणक सॉफ्टवेअर, नाटक, संगीत, ब्रांड, संलग्नता आणि अन्य तशा प्रकारचे कंटेंट, सर्व बौद्धिक संपत्ती संरक्षण अधीन आहेत.

एखाद्या कंटेंटचे बौद्धिक संपत्ती अधिकार (कॉपीराइट) अन्य व्यक्ती किंवा संघटनेने राखून ठेवले असतील आणि ते कंटेंट तुम्ही स्वतःच्या मालकीचे म्हणून पोस्ट करण्यास अनुमती नाही. आपण समुदायामधील काही कंटेंट(पोस्ट) रीशेअर करू इच्छित असल्यास, कृपया त्या पोस्टची विशेषता, वॉटरमार्क आणि मूळ माथळा (कॅप्शन) काढून टाकू नका. तसेच त्यांचे निकनेम किंवा टोपणनावाचा उल्लेख करून समुदायातील सदस्यांना योग्य ते श्रेय द्या.

आपण क्रिएटिव्ह असल्यास, आपले काम संरक्षित केले जाईल. आपणास कोणाचेही काम वापरायचे किंवा शेअर करू इच्छित असल्यास, परवानगी घ्या आणि क्रेडिट्स द्या.

हिंसा#

यात सर्व पोस्ट्स समाविष्ट आहे ज्या आमच्या वापरकर्त्यांना गैरसोयीच्या आहेत जसे की कंटेंटमध्ये रक्तमय ग्राफिकल इमेजेस किंवा व्हिडिओ जे हिंसाचे गौरव करतात किंवा हिंसाला प्रोत्साहित करण्यासाठी किंवा धोकादायक आणि बेकायदेशीर क्रियाकलापांना प्रोत्साहित करणे किंवा दहशतवादांमध्ये सामील झालेल्या ग्रुप किंवा नेत्यांची स्तुती करणे, संघटित हिंसा किंवा गुन्हेगारी कृती.

हिंसेवरील शिक्षित किंवा माहितीपूर्ण पोस्टला परवानगी दिली जाऊ शकते परंतु त्याबाबतचा तपशील कॅप्शन/ माथळा मध्ये दिलेला असावा आणि त्या पोस्टला NV ला टॅग लावून हिंसक पोस्टबाबत चेतावणी देणे आवश्यक आहे. जर आपला हेतू माहिती, शिक्षण किंवा प्रसारित जागरूकता प्रदान करण्यासाठी असल्यास हिंसक कंटेंट पोस्ट करा, पण त्याआधी आपल्या प्रेक्षकांना चेतावणी द्या!

व्देषयुक्त भाषण आणि प्रचार#

कोणत्याही व्यक्तीला धमकावणारी किंवा हिंसक वागवणूकीला प्रोत्साहन करणारी किंवा कोणत्याही विशिष्ट धर्म, जाती, वांशिकता, समुदाय, अपंगत्व (शारीरिक किंवा मानसिक), वय किंवा लिंग, हिंसक वर्तन, लक्ष्य किंवा खाली दाखविणारे कंटेंट प्रतिबंधित आहे. द्वेष निर्माण करणारी किंवा धर्म, जात, वांशिक, सामाजिक, वय किंवा लिंग यांच्यानुसार द्वेष किंवा छळ, प्रचार तयार करण्याचा किंवा प्रसार करण्याचा उद्देश असलेल्या कोणत्याही प्रकारच्या पोस्टला परवानगी नाही.

उद्रेक भाष्य आणि वापरकर्त्यांमध्ये भीतीदायक भावना आणि नकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या सिद्धांताच्या प्रकाशनापासून परावृत्त व्हा.

आम्ही आपल्याला आपले मत व्यक्त करण्याचे प्रोत्साहन देतो, परंतु आपण लिहिण्यापूर्वी विचार करा की हे एक सामाजिक प्लॅटफॉर्म आहे हे लक्षात ठेवा!

गैरवर्तन, स्वत: ची दुखापत किंवा आत्महत्या#

शारीरिक, लैंगिक, किंवा मानसियक गैरवर्तन, उपेक्षा किंवा एखाद्या व्यक्तीचे शोषण गैरवापर यांच्याशी संबंधित असणारी कोणतीही पोस्ट करणे, मग ती एखाद्या बालक किंवा प्रौढ व्यक्तीची पोस्ट असो ती प्रतिबंधित आहे. स्वत:ची हानी, दुखापत किंवा आत्महत्या दर्शवणारे किंवा स्वतःला हानी पोहचविण्यास उत्तेजन देणाऱ्या पोस्टला परवानगी नाही. तसेच गैरवर्तनामध्ये वाचलेले, स्वयं-इजा किंवा घरगुती किंवा त्यासारख्या हिंसेच्या बळी पडणार्या लोकांना नकारात्मकपणे लक्षित पोस्ट्स आणि टॅग करण्यावर मनाई आहे.

समाजातील काळजीला प्रोत्साहन द्या आणि सहाय्यक वातावरण राखा

बेकायदेशीर क्रियाकलाप#

आमच्याकडे अशा पोस्ट्स किंवा क्रियाकलापांसाठी शून्य-सहिष्णुता आहे जी अवैध गतिविधींचे समर्थन करते किंवा त्याचा प्रचार करते. संघटित गुन्हेगारी, हिंसा किंवा दहशतवादी कार्यांशी संबंधित कंटेंटला परवानगी नाही.अवैध वस्तू किंवा सेवांची विक्री, नियमन केलेली वस्तू, औषधे, आणि लैंगिक सेवांची मागणी करणे किंवा विक्री करणे यावर पूर्णपणे निषिद्ध आहे.

ज्या आशयामुळे लहान मुलांचा छळ होईल, त्यांना ज्यामुळे धोका वाटेल अथवा गलिच्छ वाटेल अशा कोणत्याही आशयाला आम्ही परवानगी देणार नाही.

जुगार अथवा अवैधरीतीने पैसे मिळवणेबाबतचा अथवा या कृत्यांना बढावा देईल असा कोणताही आशय वापरकर्त्यांनी पोस्ट करू नये.

वापरकर्त्यांना गैरव्यवहार शिकवणार्या पोस्ट ट्यूटोरियल किंवा सूचना पोस्ट करू नका (जसे की बॉम्ब तयार करणे किंवा ड्रग्स करणे). ऑनलाइन जुगार, ऑनलाइन रिअल मनी कौशल्याचे गेम्स किंवा ऑनलाईन लॉटरी यांचा प्रचार करू नका. भारत सरकारद्वारे बेकायदेशीर म्हणून घोषित असलेल्या वस्तू व सेवांचा समावेश असलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा भेटवस्तूची मागणी करण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करू नये

अन्य व्यक्तीची (जसे की आपले मित्र, प्रसिद्ध व्यक्ती किंवा ब्रॅण्ड) तोतयागिरी करणे आणि वैयक्तिक किंवा आर्थिक लाभ मिळविण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मवरील खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती वितरित करणे ही फसवणूक आहे.

कोणत्याही कॉम्प्युटरच्या कार्यक्षमेतला नियंत्रित करू शकेल असा प्रकारचा कॉम्प्युटर व्हायरस, मालवेअर किंवा इतर कॉम्प्युटर कोड असलेला आशय आपल्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करू नये.

शेअरचॅट आपल्याला कोणत्याही क्रियांचे संचालन करू देत नाही ज्या कायद्याने बंदी घातलेल्या आहेत.

गैर-संमती (वैयक्तिक) पोस्ट्स#

कोणत्याही प्रकारच्या दुसर्या व्यक्तीचे कोणतेही वैयक्तिक कंटेंट जसे की इमेजेस, व्हिडीओजला पोस्ट करण्याची अनुमती नाही जे पोस्ट केल्यानंतर त्या व्यक्तीला आवडणार नाही. मुळात, कोणाचेही व्यक्तिगत किंवा खाजगी फोटो किंवा व्हिडिओंना त्यांची परवानगी किंवा संमतीशिवाय पोस्ट करू नका. कोणत्याही व्यक्तीच्या गोपनीयतेला धोका निर्माण होईल अशा प्रकारचा कोणताही आशय पोस्ट करू नये. आम्ही अशी कंटेंट काढून टाकू जरी ते NV म्हणून टॅग केले असेल.

कोणाची वैयक्तिक माहिती किंवा संवेदनशील वैयक्तिक डेटा, मर्यादेशिवाय समावेश, फोन नंबर, पत्ता, आर्थिक माहिती, आधार क्रमांक, आणि पासपोर्ट माहिती, किंवा या माहितीचा वापर करून कोणालाही धमकावणे, याला त्यांना त्रास देणे असे मानले जाईल आणि अशा गतिविधी अस्वीकार्य आहेत.

अन्य लोकांची वैयक्तिक माहिती शेअर करण्याचा हक्क तुम्हाला नाही.

स्पॅम (Spam)#

असा आशय जो वापरकर्त्यांना आशयाच्या मुख्य स्रोतापासून दिशाभूल करतो, खोट्या जाहिराती, फसवेगिरी किंवा भ्रामक निवेदन आणि सुरक्षा उल्लंघने, हे सर्व स्पॅम मध्ये येतात. असा आशय जो आपल्या व्यावसायिक लाभासाठी पोस्ट केला जातो, त्याला व्यावसायिक स्पॅम म्हणून गणले जाते. स्पॅम पोस्ट इतर युजर्सला शेअर आणि कनेक्ट करण्यापासून दूर करतात.आपण शेअर केलेली पोस्ट प्रामाणिक असणे महत्वाचे आहे आणि प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यास मदत करतात. कोणत्याही स्पॅम, व्यवसायिकता अथवा अन्य कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी, दर्शकांना त्रास देण्याच्या किंवा माल/सेवा विक्री करण्याच्या किंवा फॉलोअर्स मिळविण्याच्या उद्देशाने एकसारखी पोस्ट वारंवार करू नका.

जर आपण आपल्या वस्तू किंवा सेवांचा प्रचार करू इच्छित असल्यास, तर आमच्या (Content Marketing Policies.) चे पालन सभ्य पद्धतीने करा.

ज्याप्रकारे तुम्हाला प्लॅटफॉर्म वापरायचा आहे त्याच प्रकारे आपल्या मित्रांना आणि ईतर युजर्सला वापरू द्या. स्पॅम करू नका!

चुकीची माहिती#

कोणतीही चुकीची माहिती असणारी पोस्ट, फसवी किंवा खोटा प्रचार करणारी व दिशाभूल, भ्रमित करण्याचा उद्देश असलेल्या पोस्टला परवानगी नाही. अस्तित्वात असलेल्या बातम्यांच्या घडामोडीत अवास्तविक बदल करून अतिशोयोक्ती करत असलेल्या पोस्टला आम्ही परवानगी देत नाही.

जर आपण आमच्या युजर्सला दिशाभूल करण्याचा किंवा एखाद्या विषयावर किंवा एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्यास किंव मानहानीकारक, निंदनीय आशय, खोट्या माहितीच्या आधारावर आर्थिक किंवा राजकीय स्थितीला दुखापत करण्याच्या प्रयत्नांनी संवेदना निर्माण करण्याचा आपला हेतू असल्यास, आम्ही ते आमच्या प्लॅटफॉर्मवर पसरू देणार नाही.

आम्ही कोणतेही व्यंगचित्र किंवा विडंबनन खोट्या माहितीसोबत गोंधळू देत नाही. काळजी करू नका, आम्हाला माहित आहे ते करमणूकीसाठी आहे, भ्रमित करण्यासाठी नाही.

जर आपण जाणूनबुजून किंवा न जानता खोट्या बातम्यांसंबंधित काहीतरी पोस्ट केले असल्यास, तर शक्य तितक्या लवकर काढा. सत्यमेव जयते!

समुदायाचे मार्गदर्शक तत्त्वे (Community Guidelines)#

जेव्हा आपण आमचे प्लॅटफॉर्म वापरता, तेव्हा आम्ही अपेक्षा करतो की आपण काही नियमांचे अनुसरण करा. अशा पद्धतीने प्रत्येक युजरने त्यांच्या सहकारी युजरला प्रेरणा दिली पाहिजे. असे केल्याने प्लॅटफॉर्म स्वच्छ आणि चांगला ठेवण्यास सोयीचे होईल. तसेच आपल्यासाठी आणि आपल्या युजर मित्रांना अॅप चालवण्यासाठी सोपे बनवते.

योग्य टॅग निवडा#

सर्व पोस्टला सर्वात योग्य टॅगसह टॅग केले जावे. जर असा टॅग अॅप वर अस्तित्वात नसल्यास, तेव्हा तुम्ही दिलेल्या सुचनेनुसार योग्य टॅग तयार करा. जर पोस्ट चुकीच्या टॅग मध्ये किवां लागू नसलेल्या टॅग मध्ये पोस्ट केली, आणि ती पोस्ट रिपोर्ट केलेली असेल तर पोस्ट फीड मधून काढली जाईल.

विषयावर रहा#

शेअरचॅट हा एक अतिशय सक्रिय प्लॅटफॉर्म आहे. इथे अनेक पोस्ट येतात आणि भरपूर चर्चा होतात. आपण पोस्ट करतांना किवां चर्चेत सहभागी होतांना खात्री करून घ्या कॅप्शन आणि पोस्टचे टॅग कशा संबंधित आहे. कॅप्शन किंवा टॅगशी संबंधित नसलेली पोस्ट किंवा अवास्तव पोस्ट काढली जाईल. विषयाशी सलग्न रहा.

विनयशील आणि विनम्र व्हा#

आम्ही अपेक्षा करतो की आमच्या प्लॅटफॉर्मवर आपण स्वत: ला आयोजित करतांना प्रामाणिकपणेचे आणि सुसंगतपणेचे पालन कराल. कठोरपणे न वागता सौजन्य दाखवा आणि सहकारी युजरचा आदर करा. आम्ही आपल्याला सल्ला देतो की कोणत्याही बेकायदेशीर गतीविधीमध्ये भाग घेवू नका ज्या समाजासाठी चांगल्या नसतील.

एकाधिक / फेक प्रोफाईल#

दुसर्या कोणत्याही व्यक्तीची बनावट प्रोफाइल तयार करणे किंवा कोणाला फसवणाऱ्या किंवा फसव्या मार्गाने छळ करणे किंवा दुसर्यांना धमकावणीच्या हेतू सोबत किंवा शिवाय प्रोफाईल बनविण्याची अनुमती नाही. समुदाय प्रोफाईल, माहितीपूर्ण प्रोफाईल आणि प्रसिद्ध व्यक्ती फॅन प्रोफाईलला परवानगी दिली जाऊ शकते. सार्वजनिक व्यक्तित्वांचे व्यंगचित्र किंवा विडंबन प्रोफाईल वर्णनामध्ये किंवा प्रोफाईलच्या स्टेटसमध्ये स्पष्टपणे नमूद केले असेल तर अकाउंट स्वीकार्य आहेत.

शब्दांची योग्य निवड#

शेअरचॅट हा एक बहुभाषिक प्लॅटफॉर्म आहे. काही शब्द जे तुम्हाला योग्य वाटत असतील पण जेव्हा त्यांचे इतर भाषांमध्ये अनुवाद केल्या जातील, तेव्हा ते आक्षेपार्ह होऊ शकतात. आम्ही आपणास प्रत्येक पोस्टला वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद आणि चाचणी करायला लावत नाही. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपल्या शब्दांचा बारकाईने विचार करा.

पोस्टमध्ये दुसर्यांचा अपमान करण्यासाठी , विरोध करणारी किंवा उत्तेजन करणारी असभ्यता असल्यास त्या पोस्टची पुन्हा तपासणी केली जाईल. पोस्टच्या संदर्भाच्या आधारावर, ती पोस्ट काढली जावू शकते.

सुरक्षितता आणि सुरक्षा#

एखाद्या व्यक्तीस त्रास देण्यास किंवा पोस्टमध्ये युजरला संबोधित करण्यास किंवा कमेंटमध्ये गैरवर्तन करण्याची अनुमती नाही. आपल्या कृतीने कोणत्याही इतर युजरला असे वाटू नये की शेअरचॅट वापरण्यास एक सुरक्षित प्लॅटफॉर्म नाही. आपण इतर कोणत्याही युजरसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास आपल्यावर कारवाई केली जाईल.

कायदेशीर कारवाई पासून सावध रहा#

कायद्याचे अज्ञान हे कधीही एक निमित्त असू शकत नाही. लक्षात ठेवा आमचा प्लॅटफॉर्म वापरण्यासाठी, आपल्याला ऑनलाइन चालणाऱ्या शासनाच्या कायद्यांचे पालन करणे आवश्यक आहे. युजरने प्लॅटफॉर्मच्या लागू कायद्यांचा आदर करावा. बेकायदेशीर विशेष कृती असलेले, उत्तेजन देणारे, ऑफर करण्या संबंधित किंवा विनवणीचा आग्रह करणार्या कोणत्याही गोष्टी सहन होणार नाही.

निलंबन चुकविणे#

कोणतेही खाते निलंबित करण्याचा आमचा निर्णय बंधनकारक आहे. इतर खाते, ओळख, व्यक्ति किंवा इतर युजर्सच्या खात्या वरील उपस्थिती वापरून निलंबन मागे घेण्याचा कुठलाही प्रयत्न देखील, निलंबन म्हणून घोषित होईल. जर आपण निलंबन रद्द करण्याचा प्रयत्न केला तर आपले खाते बंद व आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यापासून रोखण्यात येईल.

रिपोर्टिंग#

जेव्हा आपण या मार्गदर्शकतत्त्वांचे उल्लंघन करणारी कोणतीही पोस्ट किंवा क्रिया पाहता तेव्हा कृपया टॅप किंवा रिपोर्ट बटनावर क्लिक करा. जेव्हा तुम्ही बटनावर क्लिक करता तेव्हा आम्हांला सूचना मिळेल आणि आम्ही तुमच्या विनंतीवर प्रक्रिया करू. आमच्या प्लॅटफॉर्मसाठी पोस्ट किंवा कृती अयोग्य असल्याचे आम्हाला आढळल्यास, आम्ही ते काढून टाकू.

मध्यस्तीची स्थिती आणि पोस्टची पुनर्तपासणी:#

आम्ही मध्यस्थी आहोत. युजर्स काय करतात आणि बोलतात यावर आम्हीं नियंत्रण ठेवू शकत नाही. तसेच आम्ही त्यांच्या (ऑनलाइन किंवा ऑफलाइन) कृतीसाठी जबाबदार नाही. आम्ही पुरवलेल्या सेवांद्वारे जर तुम्हाला दुसर्यांनी त्यांच्याकडून सेवा किवां विशिष्ट ऑफर दिल्या असेल तर आम्ही त्यासाठी जबाबदार नाही. प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या कोणत्याही गोष्टीची जबाबदारी आणि दायित्व संपूर्णपणे भारत सरकारच्या कायद्यानुसार नियंत्रित आणि मर्यादित आहे. अॅपवर आपण काय पोस्ट करता आणि कोणत्या पोस्ट बघता त्याबद्दल तुम्ही स्वतः जबाबदार राहणार अशी आम्ही अपेक्षा करतो. प्लॅटफॉर्मवर मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात असलेली तुमची कोणतीही पोस्ट जर आमच्या युजर्स पैकी कोणीही रिपोर्ट केली तर ती पोस्ट अॅपवरून काढून टाकण्यात येवू शकते. याप्रकारच्या पोस्ट्स काढून टाकण्यासाठी काही वेळ लागतो, म्हणून कृपया आमच्याशी सहकार्य करा.

तक्रार निवारण अधिकारी#

शेअरचॅटकडे डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि प्लॅटफॉर्मच्या वापरासंबंधीच्या समस्यांकडे लक्ष देण्यासाठी एक तक्रार निवारण अधिकारी आहे.

आपण पुढीलपैकी कोणत्याही ठिकाणी आमचे तक्रार निवारण अधिकारी श्रीमती हरलीन सेठी यांच्याशी संपर्क साधू शकता:
पत्ता: क्रमांक 2 26, 27 पहिला मजला, सोना टॉवर्स, होसूर आरडी, कृष्णा नगर, औद्योगिक क्षेत्र, बेंगलुरू, कर्नाटक 560029. सोमवार ते शुक्रवार.
ईमेल: grievance@sharechat.co
नोट - कृपया आपण वापरकर्त्याशी संबंधित सर्व तक्रारी वर उल्लेख केलेल्या ईमेलवरच पाठवाव्यात, जेणेकरून आम्हाला त्यावर लवकरात लवकर कारवाई करता येईल आणि त्या तक्रारी सोडवता येतील.

नोडल संपर्क अधिकारी: श्रीमती हरलीन सेठी
ईमेल: nodalofficer@sharechat.co
कृपया याची नोंद घ्यावी - हा ईमेल हा फक्त पोलीस आणि तपास संस्थांच्या वापरासाठी आहे. ऍप वापरकर्त्यांशी संबंधित सर्व तक्रारींसाठी आपण आमच्याशी grievance@sharechat.co या ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.

आव्हान अधिकार#

जर आपण अपलोड केलेली पोस्ट किंवा आपली कृती, दुसर्या युजर्स कडून रिपोर्ट केल्या गेली आणि आमच्या प्लॅटफॉर्मवरून काढूनही टाकण्यात आली आणि आमच्या प्लॅटफॉर्मवरून काढला गेला असेल तर आम्ही आपल्याला या कारवाईबाबत सूचित करू आणि त्यामागील कारणेही देऊ. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची पोस्ट विनाकारण काढली तेव्हा तुम्ही आम्हाला grievance@sharechat.co वर तक्रार लिहू शकता. आम्ही तुमच्या पोस्टला पुन्हा पाहून ती पोस्ट प्लॅटफॉर्मवर योग्यप्रकारे पुन्हा केली जाऊ शकते की नाही ते निश्चित करू शकतो.

उल्लंघनकर्ता विरुद्ध आमची कृती#

ज्यांनी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले असेल तर आम्ही त्यांच्या विरुद्ध कारवाई करतो. जर आपली प्रोफाईल मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल रिपोर्ट झाली असल्यास, आपली प्रोफाईल 360 (तीनशे साठ) दिवसांपर्यंत तात्पुरते निलंबित केले जाऊ शकते. वारंवार मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास, आपले खाते बंद करण्यास व आमच्यासोबत रजिस्टर करण्यापासून रोखले जाऊ शकते. आवश्यक असल्यास, आम्ही कायदेशीर अधिकार्यांना सहकार्य करू आणि तुम्हाला सहाय्य करणे आमचे कर्तव्य नाही.