Skip to main content

वापरण्याच्या अटी

Last updated: 31st August 2024

वापराच्या ह्या अटी ("अटी") https://sharechat.com/ येथे स्थित आमच्या वेबसाइटचा आणि/किंवा शेअरचॅट मोबाइल अनुप्रयोगाचा आपला वापर संचालित करतात (एकत्रितपणे, "प्लेटफॉर्म" जे मोहल्ला टेक प्रा. लि. ("शेअरचॅट", "कंपनी द्वारे उपलब्ध केले आहे", "आम्ही", "आम्हाला" आणि "आमचे", भारताच्या कायद्यानुसार स्थापन केलेली खाजगी कंपनी, जिचे मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड, नॉर्थ टॉवर स्मार्टवर्क्स, वैष्णवी टेक पार्क, सर्व्हे नं. १६/१ आणि नं. १७/२ गाव अमबलीपुरा, वरथूर हुबळी, बंगळुरू शहर, कर्नाटक- ५६०१०३. येथे नोंदणीकृत कार्यालय आहे. "आपण" आणि "आपले" हे शब्द प्लॅटफॉर्मच्या वापरकर्त्यांना संबोधित केलेले आहेत.

या अटी शेअरचॅट कंटेंट आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वे, शेअरचॅट गोपनीयता धोरण, आणि आमच्या शेअरचॅट कुकी धोरण सह वाचायला हव्या. आपण या नियम आणि अटींशी सहमत नसल्यास, कृपया या प्लॅटफॉर्मचा वापर करू नका.

आमच्या सेवा (आम्ही खाली वर्णन केल्या तपशील प्रमाणे) आणि या अटी भारतीय दंड संहिते, 1860 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या अनुषंगाने मान्य केल्या आहेत आणि त्यात केलेल्या सर्व सुधारणांचा आणि त्या अन्वये तयार केलेल्या नियमांचाही समावेश आहे. जेव्हा आपण आमच्या प्लॅटफॉर्मवर खाते तयार करता किंवा आमच्या प्लॅटफॉर्म किंवा आमच्या सेवांपैकी कोणत्याही सेवा वापरता तेव्हा आपण या अटीं स्वीकारता आणि त्यांच्याशी सहमत होता. तथापि, कृपया लक्षात ठेवा की आम्ही असे प्रतिनिधित्व करीत नाही की आम्ही भारताचे प्रजासत्ताका व्यतिरिक्त कोणत्याही देशाच्या कायद्यांचे पालन करीत आहोत. आपण आमच्या सेवांचा वापर करू इच्छित असल्यास, कृपया हे सुनिश्चित करा की आपल्या अधिकारक्षेत्रात असे करण्याची आपल्याला परवानगी आहे.

आपण आमचे प्लॅटफॉर्म वापरता तेव्हा आपल्याला आणि आम्हाला काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आम्ही या अटींमधील या नियमांची यादी केली आहे. कृपया येथे नमूद केलेले हे नियम आणि इतर सर्व लिंक काळजीपूर्वक वाचा. कृपया लक्षात ठेवा की आमचा प्लॅटफॉर्म वापरत असल्यास हे मानले जाईल की आपण या अटींशी सहमत आहात. तसेच, आपण भारताबाहेर ही सेवा वापरत असल्यास, कृपया आपल्या स्थानिक कायद्यांचे पालन करा.

अटी व शर्तींमधील बदल

आमचे प्लॅटफॉर्म गतिमान आहे आणि त्याची वेगाने बदलण्याची शक्यता आहे. म्हणून, आम्ही प्रदान केलेल्या सेवा आमच्या विवेकाने बदलू शकतो. आम्ही तात्पुरते, किंवा कायमचे, सेवा किंवा आपल्यासाठी कोणतीही वैशिष्ट्ये प्रदान करणे बंद करू शकतो.

आम्ही कोणतीही सूचना न देता आमच्या प्लॅटफॉर्म आणि सेवांमध्ये कार्यप्रदर्शन काढू किंवा जोडू शकतो. तथापि, जर आम्ही तेथे बदल केला जिथे आपली संमती आवश्यक आहे, तर आम्ही खात्रीने आपणांस ती मागू. कृपया आमचे नवीनतम बदल आणि घडामोडींवर अद्ययावत राहण्यासाठी वेळोवेळी या पृष्ठावर भेट देणे सुनिश्चित करा.

वेळोवेळी आम्ही जो बदल करू शकतो आणि आम्ही जोडू किंवा सुधारित करू शकतो त्या सेवा पाहण्यासाठी या पृष्ठावर भेट द्या.

आमच्या सेवा कोण वापरू शकते

आमचे प्लॅटफॉर्म आपल्याला आपल्या मित्रांच्या संपर्कात राहण्यास मदत करते आणि आपल्या पसंतीच्या प्रादेशिक भाषेमध्ये इमेजेस, व्हिडिओ, संगीत, स्थिती अपडेट आणि अधिक काही शेअर करण्यास आपल्याला सक्षम करते. आम्ही आपल्या पसंतीचे कंटेंट समजतो आणि आपणांस पोस्ट, चित्रे, व्हिडीओ दर्शविण्यासाठी आपल्या होम फीडला वैयक्तिकृत करतो आणि आमच्या प्लॅटफॉर्म ("सेवा/सेवा") वर उपलब्ध असलेल्या कंटेंटचा सल्ला देतो.

आपण आमच्या सेवांचा वापर केवळ तेव्हाच करू शकता जेव्हा आपण आमच्याशी बांधील करार तयार करण्यास सक्षम आहात आणि आमच्या सेवांचा वापर करण्यास कायदेशीररित्या परवानगी प्राप्त आहात. जर आपण या अटी एखाद्या कंपनीच्या किंवा कोणत्याही कायदेशीर व्यक्तीच्या वतीने स्वीकारत असाल, तर आपण प्रतिनिधित्व करता आणि हमी देता की आपण या संस्थेला अशा अटींशी बांधील करण्यास आणि प्रभावीपणे "आपण" आणि "आपले" कंपनीसाठी उल्लेख करण्यास अधिकृत आहात.

कृपया याची खात्री करा की आपल्याला कायद्याच्या अंतर्गत आमची सेवा वापरण्याची परवानगी आहे.

आमच्या सेवांचा वापर कसा करावा?

आम्ही एक अद्वितीय प्लॅटफॉर्म विकसित केला आहे. आमची सेवा विशेषतः केवळ प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. आम्ही आपल्याला वैयक्तिकृत कंटेंट देण्याचा आणि ते कंटेंट दर्शविण्याचा प्रयत्न करतो जे आपल्याला आनंद देईल. आम्ही आपल्याला आमच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेली कंटेंट डाउनलोड करण्याचे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले शेअरचॅट अनुभव शेअर करण्याची परवानगी देतो. आमच्या सेवांचा वापर करण्यासाठी हे आवश्यक आहे की आपण आपला फोन नंबर आणि आपल्या फोन नंबरवर आमच्याद्वारे SMS द्वारे पाठविलेला OTP प्रविष्ट करून, आमच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी. जेव्हा आपण शेअरचॅट मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर करुन आमच्याशी नोंदणी करता तेव्हा आपण आम्हाला आपले मोबाइल डिव्हाइस फोन बुक, आपला SMS इनबॉक्स वाचण्याची, आपली मोबाईल गॅलरी, मोबाईल डिव्हाइस स्टोरेज आणि मोबाईल डिव्हाइस कॅमेरा वापरण्याची परवानगी देखील देता. तथापि, आम्ही आपल्या परवानगीशिवाय आपल्या मोबाइल डिव्हाइस आणि संगणकावर संग्रहित केलेली कोणतीही माहिती वाचत नाही.

आपल्याला सेवा प्रदान करण्यासाठी, आम्हाला आपल्या मोबाइल डिव्हाइसच्या विशिष्ट वैशिष्ट्यांमध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता आहे.

गोपनीयता धोरण

आपल्याला कोणतीही नवीन सेवा प्रभावीपणे प्रदान आणि परिचय करण्यासाठी, आम्ही आपल्याकडून काही विशिष्ट माहिती संकलित करतो, जसे आपला फोन नंबर, आपले लिंग आणि आपले नाव. आम्ही अतिरिक्त माहितीसाठी आपणांस विनंती करू शकतो आणि अतिरिक्त माहिती संचयित करू शकतो. ही माहिती ऍमेझॉन वेब सेवा किंवा "AWS" क्लाउड सर्व्हर आणि "गूगल क्लाउड प्लॅटफॉर्म" क्लाउड सर्व्हरवर सुरक्षितरित्या संग्रहित केली जाते, त्यामुळे ती AWS आणि गूगल क्लाउड गोपनीयता धोरणाच्या अटींच्या अधीन देखील आहे. शेअरचॅट गोपनीयता धोरण समजवतो की आम्ही एकत्रित केलेली माहिती कशी एकत्रित करतो, वापरतो, शेअर करतो आणि साठवतो. शेअरचॅट गोपनीयता धोरण कायद्यांतर्गत आपल्या अधिकाराचे आणि आपण आम्हाला प्रदान केलेल्या डेटावर आपण नियंत्रण कसे करू शकता याचे वर्णन करतो.

आम्ही हे वर्णन केलेले आहे की आम्ही शेअरचॅट गोपनीयता धोरण मध्ये ही माहिती कशी संचयित करतो आणि तिचा वापर करतो.

गोपनीयता धोरणांतर्गत सांगितल्याप्रमाणे, आम्ही प्लॅटफॉर्मवर तृतीय-पक्ष एम्बेडस आणि सेवा देखील वापरू शकतो. अशा API सेवा आणि एम्बेडसचा वापर संबंधित तृतीय-पक्ष सेवांच्या धोरणांतर्गत कव्हर केल्या जातात. अशा एम्बेड किंवा API सेवा वापर करून, तुम्ही पुढे येथे दिलेल्या तृतीय पक्षाच्या सेवा अटींशी बांधील राहण्यास सहमती देता.

आपली कर्तव्ये

एक व्यापक समुदायासाठी सुरक्षित सेवा प्रदान करण्यासाठी आम्हा सर्वांना आपापली भूमिका निभावणे आवश्यक आहे. आमची सेवा प्रदान करण्यासाठी आमच्या बांधिलकीच्या परताव्यासाठी, आपल्याला आम्हास काही वचन देणे आवश्यक आहे. कृपया आपण हे लक्षात घ्यावे की तुम्ही शेअरचॅट प्लॅटफॉर्मवर केलेल्या प्रत्येक कृतीची किंमत आणि त्याच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी ही तुमचीच असेल (त्यामध्ये आपल्याकडून करण्यात आलेल्या अटींचे उल्लंघनही समावेश आहे) तसेच यामध्ये आपण वचनबद्ध असलेल्या वचनांचाही समावेश आहे. आमच्याकडे आपली ही वचनबद्धता अशी आहे:

a. कोणतीही तोतयागिरी किंवा असत्य माहिती प्रदान करायची नाही

जेव्हा आपल्याला आमच्या प्लॅटफॉर्मवर आपले वास्तविक नाव वापरायचे नसेल, तेव्हा आपल्याला आमच्या सेवांचा वापर करण्यासाठी आपला योग्य फोन नंबर आणि लिंग प्रविष्ठ करणे आवश्यक आहे. आपण आमच्या सेवेचा वापर करण्यासाठी स्वत: ला इतर व्यक्ती म्हणून किंवा अन्य व्यक्तीचे प्रतिनिधी म्हणून खोटे प्रतिनिधित्व करणार नाही. जर आपण उपहासात्मक विडंबन किंवा विनोदी हेतूने एखादे पेरोडी खाते संचालन करीत असाल तर आपल्याला शेअरचॅट बायोमध्ये ते नमूद करणे आवश्यक आहे.

b. डिव्हाइस सुरक्षा

आमच्या प्लॅटफॉर्म सुरक्षित आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही उपाय लागू केले आहेत. तथापि, आम्ही ह्याची खात्री देऊ शकत नाही की आमचा प्लॅटफॉर्म हॅकिंग आणि व्हायरस पासून सुरक्षित आहे. आपण याची खात्री कराल की आपल्या मोबाइल डिव्हाइस आणि कॉम्प्यूटरवर त्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक विरोधी मालवेअर आणि अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर आहेत. आपण कोणत्याही व्यक्तीला आपला फोन नंबर वापरण्याची आणि आपल्या फोन नंबरशी एकाधिक खाती लिंक करण्याची परवानगी देणार नाही. आपण आपल्या फोन नंबरशी लिंक केलेल्या कोणत्याही खात्याद्वारे पोस्ट केलेल्या सर्व कंटेंटसाठी जबाबदार असाल.

जेव्हा आम्ही आमच्या सेवांचा वापर सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते सर्वच करत आहोत, तेव्हा हे लक्षात ठेवा की आम्ही हा विचार करू शकत नाही की आमच्या प्लॅटफॉर्मवर कश्या-कश्या प्रकारचा हल्ला होऊ शकतो. एक सराव म्हणून आपण खात्री करायला पाहिजे की आपल्या मोबाइल डिव्हाइस आणि संगणकाचा चुकीचा वापर केला जात नाही किंवा त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही.

c. कंटेंट काढणे आणि समापन

आमच्या प्लॅटफॉर्मवरील आपला वापर शेअरचॅट कंटेंट आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांनी संचालित केला जातो. जर आमचा कोणीही वापरकर्ता रिपोर्ट करतो की तुमचे कंटेंट शेअरचॅट कंटेंट समुदाय मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे, तर आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवरून अशे कंटेंट काढू शकतो. जर शेअरचॅट कंटेंट आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांच्या उल्लंघनाशी संबंधित एकाधिक रिपोर्ट प्राप्त केले जातात, तर आम्हाला आमच्याकडील तुमचे खाते संपवून टाकण्यास व आमच्यासह आपली नोंदणी करण्यापासून रोखण्यास भाग पाडले जाऊ शकते. आपण अश्या कोणत्याही कार्यवाही अपील करू इच्छित असल्यास, आपण grievance@sharechat.co वर आम्हाला तसे लिहू शकता.

जर अशे कंटेंट शेअरचॅट कंटेंट आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांच्या अंतर्गत प्रतिबंधित असेल तर आपण आमच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेले कोणतेही कंटेंट काढून टाकू शकता.

d. हा प्लॅटफॉर्म काहीही गैरकृत किंवा अवैध कार्यासाठी वापरले जाऊ नये

आमचे प्लॅटफॉर्म, भाषेची आणि संस्कृतींची बहुलता आणि विविध प्रकारची कंटेंट सामावून घेण्यासाठी डिझाइन केले आहे. या प्रभावासाठी, आम्ही कंटेंटचे स्वरूप वर्गीकृत करण्यासाठी विविध टॅग विकसित केले आहेत. त्यामुळे आपण आपल्याद्वारे शेअर केलेल्या कंटेंटचे स्वरूप योग्यरित्या ओळखणे आणि त्याला योग्य रीतीने टॅग करणे आवश्यक आहे. कोणत्याही हिंसक कंटेंटसह सर्व प्रौढ कंटेंटंना "18+" म्हणून टॅग केले जावे.

तथापि, आपण आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर अश्या कंटेंटसाठी नाही करणार जी अश्लील, पोर्नोग्राफिक, अल्पवयीन लोकांना घातक, भेदभावयुक्त, द्वेषयुक्त भाषण पसरवणारी, कोणत्याही व्यक्तीविरूद्ध हिंसा किंवा तिरस्कार प्रसारित करणारी, कोणत्याही प्रलोभनात्मक स्वरूपाची, किंवा भारतीय प्रजासत्ताकाच्या कोणत्याही कायद्याचे उल्लंघन करणारी, किंवा जिच्यावर भारतीय प्रजासत्ताकाच्या कोणत्याही कायद्याद्वारे शेअर करण्यास बंदी घातली आहे. आम्ही अशे कंटेंट काढण्याचा अधिकार राखून ठेवत आहे. कृपया अधिक तपशीलांसाठी शेअरचॅट कंटेंट आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वे वाचा.

उपरोक्त नमूद केल्याच्या व्यतिरिक्त, कृपया लक्षात घ्या की आम्ही आपली माहिती योग्य कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यासह शेअर करू शकतो, जर आम्हाला असा विश्वास आहे की कोणत्याही कायदेशीर बंधने किंवा कोणत्याही सरकारी विनंतीचे पालन करण्यासाठी आम्हाला आपला वैयक्तिक डेटा किंवा माहिती शेअर करणे आवश्यक आहे; किंवा हे अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी किंवा आमच्या मालमत्ता किंवा सुरक्षा, आमचे ग्राहक किंवा जनतेस होणाऱ्या कोणत्याही हानीस प्रतिबंध करण्यासाठी; किंवा सार्वजनिक सुरक्षा, फसवणूक, सुरक्षा किंवा तांत्रिक समस्या शोधण्यासाठी प्रतिबंध करण्यासाठी किंवा अन्यथा संबोधित करण्यासाठी असू शकते.तथापि, आपण हे समजता की आमच्या प्लेटफॉर्मचा उपयोग केल्याने आपल्या द्वारे आम्हाला किंवा एखाद्या तृतीय पक्षाद्वारे किंवा वापरकर्त्याद्वारे आपणांस केलेल्या कोणत्याही कृतीसाठी आम्ही जबाबदार धरले जाऊ शकत नाही.

आपण लोकांना एकत्र येण्यासाठी एक प्लॅटफॉर्म विकसित केले आहे; कृपया अशे कोणतीही कंटेंट शेअर करू नये जी बेकायदेशीर किंवा समाजातील सदस्यांच्या हिताला कोणतेही नुकसान करणारे आहे.

e. कंटेंट अधिकार आणि जबाबदाऱ्या

आमचा अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यामध्ये पूर्ण विश्वास आहे आणि आम्ही आपल्याला आमच्या प्लॅटफॉर्मवर छायाचित्रे, प्रतिमा, व्हिडिओ, संगीत, स्थिती अपडेट आणि अन्य कंटेंट शेअर करण्याची परवानगी देतो. आमचा आपल्याद्वारे शेअर केलेल्या कोणत्याही कंटेंटवर मालकीचा कोणताही अधिकार नाही आणि कंटेंटवरील अधिकार फक्त आपलाच राहतो. आपण आमच्या किंवा कोणत्याही तृतीय-पक्षांच्या बौद्धिक संपत्ती अधिकारांवर कब्जा करण्यासाठी किंवा उल्लंघन करण्यासाठी आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करणार नाही. जे कंटेंट शेअरचॅट कंटेंट आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात आहे आणि ते प्लॅटफॉर्मवरून काढले जाऊ शकते. शिवाय, जर आपण आमच्याद्वारे विकसित केलेली कोणतेही कंटेंट वापरत असाल, तर आम्ही अशा कंटेंटवरील बौद्धिक संपत्ती अधिकारांची मालकी पुढे चालू ठेवू.

आमच्या सेवांचा वापर करून तुम्ही शेअर / पोस्ट / अपलोड केलेल्या कंटेंटद्वारे, तुम्ही आम्हाला (आणि आमचा गट आणि सहयोगी) यांना एक नॉन-एक्सक्लुझिव्ह, रॉयल्टी-मुक्त, हस्तांतरणीय, उप-परवानायोग्य, जगभरात कुठेही होस्ट करण्याची मुभा देत ,तुमच्या कंटेंटचे (तुमची गोपनीयता धोरण आणि अनुप्रयोग सेटिंग्ज अनुसार) वापर, वितरण, चालविणे, कॉपी, प्रदर्शित करण्याचा किंवा त्याच्या अनेक प्रति बनविणे आदी गोष्टींचा वापर आमच्या सेवांच्या पुरवठा , नवीनता आणि सुधारणेसाठी , मार्केटिंगसाठी, तुम्हाला किंवा आमच्या सेवांचे प्रमोशन करण्यासाठी आणि आम्ही किंवा आमच्या समुदायाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांवर तुमचा कंटेंट प्रदर्शित करणे आदी बाबींसाठी केला जाईल . तुम्ही तुमचा कंटेंट आणि/किंवा अकाउंट कोणत्याही क्षणी डिलीट करू शकता किंवा आमच्या डेटा संग्रह धोरणांनुसार तुमचे कंटेंट/ अकाउंट हटवले जाऊ शकते. तथापि, तुमचा कंटेंट जर इतरांसोबत शेअर केला गेलेला असेल तर तो प्लॅटफॉर्मवर तसाच दिसत राहील. शिवाय, जर तुम्ही तुमची अकाउंट डिलीट करण्याची प्रक्रिया स्वतः सुरु केली असेल तर आम्ही तुम्ही तयार केलेला कंटेंट आणि इतर डेटा ठराविक कालावधीसाठी राखून ठेवू शकतो जेणेकरुन तुमचे अकाउंट पुनर्संचयित करता येईल, आम्ही तुमच्याद्वारे दिलेली माहिती कशी वापरतो, आणि तुम्ही तुमच्या कंटेंटला कसे नियंत्रित अथवा डिलीट करू शकता याबाबत अधिक माहितीसाठी, कृपया ShareChat प्रायव्हसी पॉलिसी वाचा.

आमच्या प्लॅटफॉर्मवर आपण पोस्ट केलेल्या कंटेंटसाठी आपण पूर्णपणे जबाबदार आहात. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर किंवा त्याद्वारे शेअर केलेल्या किंवा पोस्ट केलेल्या कोणत्याही कंटेंटचे समर्थन करीत नाही आणि आम्ही अशा शेअरींग किंवा पोस्टिंगच्या परिणामांसाठी जबाबदार नाही. आपल्याद्वारे शेअर केलेल्या कंटेंटवर आमच्या लोगोची किंवा कोणत्याही ट्रेडमार्कची उपस्थितीचा अर्थ असा नाही की आम्ही आपल्या कंटेंटला मान्यता दिली आहे किंवा त्याला प्रायोजित केले आहे. पुढे, आम्ही आपल्याद्वारे प्लॅटफॉर्मच्या इतर प्रयोक्त्यांसह केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या परिणामासाठी जबाबदार किंवा दायित्व असणार नाही.

आपण शेअर केलेल्या कंटेंटसाठी आपल्याकडे नेहमी मालकी आणि जबाबदाऱ्या असतील. आम्ही आपल्या कंटेंटवर बौद्धिक संपत्ती अधिकार असल्याचा कधीच दावा करणार नाही, परंतु आमच्या प्लॅटफॉर्मवर आपण काय शेअर करता आणि पोस्ट करता हे वापरण्यासाठी आमच्याकडे एक विनामूल्य, कायमचा परवाना असेल.

f. मध्यस्थाची स्थिती आणि उत्तरदायित्व नाही

आम्ही माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा (मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यम नीतितत्त्वे) नियम, २०२१ अन्वये एक मध्यस्थ आहोत. हे नियम माहिती तंत्रज्ञान कायदा (मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यम नीतितत्त्वे) नियम, २०२१ च्या नियम 3 (1) च्या तरतुदींनुसार प्रकाशित केले आहेत, ज्यासाठी नियम आणि विनियम, शेअरचॅट गोपनीयता धोरण आणि आमच्या प्लेटफॉर्मवर प्रवेश करण्यासाठी आणि वापरण्यासाठी शेअरचॅट वापर अटीचे प्रकाशन करणे आवश्यक आहे. आमची भूमिका आपण आणि आमच्या इतर वापरकर्त्यांद्वारे शेअर केलेली कंटेंट प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करण्यापर्यतच मर्यादित आहे.

आम्ही हे नियंत्रित करत नाहीत की लोक काय करतात किंवा काय म्हणतात आणि आम्ही त्यांच्या (किंवा तुमच्या) कृतीसाठी (ऑनलाइन किंवा ऑफलाइन असोत) जबाबदार नाही. आम्ही इतरांद्वारे ऑफर केलेल्या सेवा आणि वैशिष्ट्यांसाठी जबाबदार नाही, जरी आपण आमच्या सेवांद्वारे त्यांच्यावर प्रवेश केला असला तरीही. आमच्या प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या कोणत्याही गोष्टीसाठी आमची जबाबदारी कठोरपणे भारत गणराज्याच्या कायद्यानुसार नियंत्रित आहे आणि ती त्या सीमेपर्यंत मर्यादित आहे. आपण सहमत आहात की आम्ही या अटींमधून उद्भवणारे किंवा त्यासंबंधित संबंधित कोणत्याही लाभ, महसूल, माहिती किंवा डेटा किंवा परिणामस्वरुप, विशेष, अप्रत्यक्ष, अनुकरणीय, दंडात्मक किंवा आनुषंगिक नुकसानास जबाबदार नाही, जरी आम्हाला माहित आहे की ते होणे शक्य आहेत. ह्यात ते शामिल आहे जेव्हा आम्ही आपले कंटेंट, माहिती, किंवा खाते हटवतो.

आम्ही भारतीय कायद्यांतर्गत मध्यस्थ आहोत. आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर लोक काय पोस्ट करतात त्यावर नियंत्रण ठेवत नाही परंतु आम्ही प्रत्येक व्यक्तीस शेअरचॅट कंटेंट आणि समुदाय मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करण्याची अपेक्षा करतो.

g. आपण शेअरचॅट मध्ये व्यत्यय आणण्याचा किंवा धोक्यात टाकण्याचा प्रयत्न करणार नाही.

आम्ही एक समुदाय-समर्थित प्लॅटफॉर्म विकसित केले आहे. त्यामुळे आपण आमचे प्लॅटफॉर्म, सेवा, आणि आमच्या तांत्रिक वितरण प्रणालीच्या गैर-सार्वजनिक क्षेत्रांत व्यत्यय आणण्यास किंवा त्याचा वापर न करण्यास सहमत आहात. आपण कोणत्याही युजर माहितीसाठी आमच्या प्लॅटफॉर्मला कोणत्याही ट्रोजन्स, व्हायरस, इतर कोणत्याही दुर्भावनापूर्ण सॉफ्टवेअर, कोणतेही बॉट किंवा स्क्रेपद्वारे परिचित करणार नाही. त्याशिवाय, आपण आमच्याद्वारे लागू केलेल्या कोणत्याही प्रणाली, सुरक्षा किंवा प्रमाणीकरण मापदंड च्या भेद्यतेची तपासणी, स्कॅन, किंवा चाचणी करणार नाही. जर आपण आमच्या तांत्रिक रचना आणि आर्किटेक्चरसह लुडबुड केली किंवा लुडबुड करण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही आपली युजर प्रोफाइल समाप्त करू शकतो. आम्ही योग्य कायदे अंमलबजावणी अधिकाऱ्यांकडे अशा कृतींची तक्रार करु शकतो आणि तुमच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करू शकतो.

आपण आमचा प्लॅटफॉर्म हॅक करणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचे दुर्भावनायुक्त सॉफ़्टवेअर प्रविष्ट करणार नाही. आपण अशा कृती करता तर आम्ही आपल्याला प्लॅटफॉर्मवरून काढू शकतो आणि आपल्या कृतींची पोलिसांत रिपोर्ट देखील करू शकतो.

लाइव्हस

शेअरचॅट प्लॅटफॉर्मचा एक भाग म्हणून आम्ही आपणांस लाइव्हस हे फिचर देत आहोत ज्याद्वारे तुम्हाला तुमचे रिअल टाइम मधील व्हिडिओस आपल्या प्लॅटफॉर्मवर प्रसारित करता येतील. तुम्ही प्रसारित केलेल्या व्हिडिओसवर इतर वापरकर्ते कमेंटही करू शकतील ज्यामुळे प्लॅटफॉर्मवर रिअल टाईममध्ये एकमेकांना संपर्क करणे शक्य होईल.

लाइव्हस फीचरद्वारे अपलोड करण्यात आलेला सर्व आशय हा शेअरचॅट आशय आणि समुदाय नियमांच्या अधीन असेल. या फीचरद्वारे अपलोड केलेला आशय जर वरील अटी आणि शेअरचॅट आशय आणि समुदाय नियमांनुसार नसेल तर आम्हाला तो आशय तात्काळ काढून टाकण्याचा अधिकार आहे.

आम्ही वेळोवेळी लाइव्हस फीचरच्या कार्यक्षमतेत कमी अधिक प्रमाणात बदल करू शकतो. तसेच आम्ही आमच्या शेअरचॅट प्लॅटफॉर्मवरून लाइव्हस हे फीचर कधीही काढून टाकू शकतो. लाइव्हस फीचर हे नेहमीच त्रुटींविरहित अथवा नेहमीच आपल्यासाठी उपलब्ध असेल, लाइव्हस फीचर हे नेहमी कोणत्याही व्यत्ययाविना चालेल किंवा लाइव्हस फीचरद्वारे पोस्ट केलेला प्रत्येक आशय हा बरोबरच असेल या सर्व गोष्टींची आम्ही हमी देत नाही.

आपल्याला लाइव्हस फीचरच्या माध्यमातून इतर वापरकर्त्यांशी रिअल टाइममध्ये संवाद साधता यावा यासाठी आम्ही ते फीचर आपल्याला दिले आहे पण त्यावर आपण शेअरचॅट आशय आणि समुदाय नियमांनुसार प्रतिबंधित असलेला आशय अपलोड करून त्या फीचरचा गैरवापर करू नये. आम्ही या फीचरच्या पुढील काळातील उपलब्धतेबाबत कोणतीही हमी देत नाही.

शेअरचॅट स्टार क्रिएटर

आपल्या प्लॅटफॉर्मवरील सर्व शेअरचॅट स्टार क्रिएटर्स म्हणजेच आमचे सहकारी क्रिएटर्स हे आता त्यांच्या प्रोफाईलवर असलेल्या निळ्या बॉर्डरने ओळखता येतील (नाही की नेहमीप्रमाणे त्यांच्या प्रोफाइल फोटोवर असलेल्या पांढऱ्या बॉर्डरमुळे.) अशा सर्व स्टार क्रिएटर्ससोबत आम्ही आता आशय परवाना आणि विपणन व्यवस्थापन प्रक्रिया सुरु करणार आहोत.

अनुपालन आवश्यकता

बातम्या आणि ताज्या घडामोडींबाबत माहिती प्रकाशित करणाऱ्या वापरकर्त्यांनी त्यांच्या शेअरचॅट अकाऊंटची सर्व माहिती नवीन लागू केलेल्या नियमांनुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाला द्यावी.

आपण आम्हाला खालील गोष्टींची परवानगी देता

आपण या अटी स्वीकार करता आणि आम्हाला काही परवानग्या देता, जेणेकरून आम्ही अधिक चांगली सेवा देऊ शकू. आपण आम्हाला मंजुरी दिलेल्या परवानग्या आहेत:

a. आपली प्रोफाईल माहिती तृतीय पक्षांसह शेअर करण्यासाठी परवानगी

जिथे आमचा प्लॅटफॉर्म मुक्तपणे प्रवेशयोग्य आणि वापरण्यायोग्य प्लॅटफॉर्म आहे, तिथेच आम्हाला महसूल उत्पन्न करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून आम्ही आपल्याला आमच्या सेवा विनामूल्य देऊ शकू. याचे अवलंबन केल्यामुळे, आम्ही आपले वापरकर्ता नाव आणि लिंग आणि कोणताही डेटा शेअर करू शकतो, जे आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आपल्याला प्रायोजित कंटेंट किंवा जाहिराती दर्शविण्यासाठी आपल्या वापर सवयीं आणि नमुन्यांशी संबंधित कोणत्याही डेटा संकलित करू शकतो. तथापि, आम्ही आपण जाहिरात केलेल्या कोणत्याही उत्पादनांची खरेदी केल्यास आपल्याला कोणत्याही कमाईचा वाटा देण्यास जबाबदार असणार नाही. आपण कोणत्याही उत्पादनांचे समर्थन करत नाही किंवा उत्पादनांच्या प्रामाणिकतेसाठी हमी देत ​​नाही. आमच्या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांद्वारे उत्पादनांची जाहिरात करणे हे आमच्याकडून ऍन्डोर्समेंटचे प्रमाण नाही.

जर आम्ही आपला वंश, जात, किंवा आरोग्यविषयक माहिती, बायोमेट्रिक्स इत्यादी सारखी संवेदनशील माहिती शेयर करतो तर ती शेयर करण्यापूर्वी आम्ही आपली संमती घेऊ.

b. स्वयंचलित डाउनलोड्स व अपडेट्स

आम्ही सतत आमचा प्लॅटफॉर्म व प्रस्तुत केलेल्या सेवा अपडेट करीत आहोत. आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी, आपल्याला आपल्या मोबाइल डिव्हाइसवर शेअरचॅट मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करण्याची आणि वेळोवेळी ती अपडेट करायची आवश्यकता असू शकेल.

अॅप्लिकेशन्स आणि सॉफ्टवेअर आपल्या वापरासाठी सतत अपडेट केले जाते आणि प्रत्येक वेळी अशा अपडेट व्युत्पन्न केल्यावर आपल्याला शेअरचॅट मोबाइल अनुप्रयोगाची नवीनतम आवृत्ती आपल्या मोबाइल डिव्हाइसवर स्थापित करण्याची आवश्यकता असेल.

c. कुकीज वापरण्याची परवानगी

आम्ही संकलन करण्यासाठी कुकीज, पिक्सेल टॅग, वेब बीकन, मोबाइल डिव्हाइस ID, फ्लॅश कुकीज आणि तत्सम फाइल्स किंवा तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो आणि सेवांच्या आपल्या वापराबद्दल आणि तृतीय-पक्ष वेबसाइट्सच्या संदर्भात ही माहिती संग्रहित करू शकतो. कृपया या विभागात वर्णन केलेल्या कुकीज आणि इतर तंत्रज्ञानाच्या वापराशी संबंधित अधिक माहितीसाठी शेअरचॅट कुकी धोरण पहा, ज्यांत अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाशी संबंधित आपल्या निवडी संबंधित तंत्रज्ञान शामिल आहे.

सर्व वेबसाइट्स कुकीज वापरतात आणि त्यांना तुमच्या वेब ब्राउझरवर संग्रहित करतात जेणेकरून ती वापर माहिती आपल्या ब्राउझरमध्ये संग्रहित आणि लॉग केली जाऊ शकते. अधिक तपशीलासाठी, कृपया शेअरचॅट कुकी धोरण वाचा.

d. डेटा धारणा

आम्ही आपल्या प्लॅटफॉर्मच्या वापराबद्दल काही विशिष्ट माहिती थांबवून ठेऊ शकतो. कृपया आमच्याद्वारे आपल्या माहितीच्या संग्रह, संचयन आणि वापराशी संबंधित अधिक माहितीसाठी शेअरचॅट गोपनीयता धोरण पाहा.

आपण आम्हाला आपल्याशी संबंधित आणि आपल्याद्वारे प्रदान केली माहिती संचयित आणि ठेवण्याचा अधिकार प्रदान केला आहे. पुढील माहितीसाठी कृपया गोपनीयता धोरण पहा.

आमचा करार आणि जर आम्ही असहमत असू तर काय होते

a. या अटींच्या अन्वये कोणाचे अधिकार आहेत

या अटींअंतर्गत हक्क आणि कर्तव्ये केवळ आपल्यालाच दिली गेली आहेत आणि त्या आमच्या संमती शिवाय कोणत्याही तृतीय पक्षाला नियुक्त केल्या जाणार नाहीत. तथापि, आम्हाला इतरांना या अटींअंतर्गत आपले हक्क आणि कर्तव्ये देण्याची परवानगी आहे. असे तेव्हा होऊ शकते, जेव्हा उदाहरणार्थ, आम्ही दुसर्या कंपनीशी विलीनीकरण करू आणि एक नवीन कंपनी तयार करू.

b. आम्ही विवाद कसे हाताळू

सर्व प्रकरणांमध्ये, आपण सहमत आहात की विवाद भारत गणराज्याच्या कायद्याच्या अधीन असतील आणि बंगलोरच्या न्यायालयांमध्ये अशा सर्व प्रकारच्या वादांवर विशेष कार्यक्षेत्र असेल.

तक्रार निवारण यंत्रणा

आमच्या युजर्सच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी आमच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, आमच्या युजर्सना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सरकारी अधिकाऱ्यांसोबत काम करत आहोत. आम्ही एक तक्रार अधिकारी नियुक्त केला आहे, जर युजरला त्यांच्या शेअरचॅट अनुभवाबद्दल तक्रार असेल तर त्यांच्याशी थेट संपर्क साधला जाऊ शकतो. शेअरचॅटच्या संदर्भात तुम्ही उपस्थित केलेल्या कोणत्याही समस्या किंवा तक्रारींचे निराकरण करण्यात मदत करण्यासाठी आम्ही एक मजबूत तक्रार निवारण यंत्रणा तयार केली आहे.

तक्रार निवारणासाठी विविध यंत्रणा खाली दिल्या आहेत:

  1. तुम्ही युजर प्रोफाइलची तक्रार करू शकता आणि आमच्या कम्युनिटी गाईडलाईन्सचे उल्लंघन करणाऱ्या कन्टेन्टबद्दल तक्रारी करू शकता. ज्या पोस्ट/कमेंट/युजर प्रोफाइलसाठी तक्रार सबमिट करायची आहे त्यापुढील उपलब्ध असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून तक्रार केली जाऊ शकते. तुम्ही योग्य कारण निवडू शकता आणि रिपोर्ट पर्यायावर क्लिक करू शकता. प्रत्येक तक्रारीचे स्टेटस प्रोफाइल सेटिंग्ज टॅब अंतर्गत उपलब्ध रिपोर्ट्स पेजवर तपासले जाऊ शकते. तुम्ही प्रोफाइल सेटिंग्ज टॅब अंतर्गत उपलब्ध असलेल्या हेल्प आणि सपोर्ट पर्यायाद्वारे देखील समस्या मांडू शकता.
  2. तुमच्‍या विरुद्ध किंवा तुम्ही अपलोड कन्टेन्टविरुद्ध केली गेलेली असल्‍यास, तुम्‍ही प्रोफाइल सेटिंग्‍ज टॅब अंतर्गत उपलब्‍ध असलेल्‍या व्हायोलेशन पेजवर तपशील पाहू शकता. तुम्ही अपील नोंदवू शकता आणि व्हायोलेशन पेजवर तुमचे अपील सिद्ध करण्यासाठी कमेंट्स जोडू शकता.
  3. तुम्ही तुमची तक्रार https://support.sharechat.com/ वर उपलब्ध वेबसाइट चॅटबॉट यंत्रणेद्वारे देखील नोंदवू शकता.
  4. तुम्ही तुमच्या समस्या किंवा तक्रारीसह contact@sharechat.co आणि grievance@sharechat.co वर ईमेल पाठवू शकता.
  5. तुम्हाला एक तिकीट क्रमांक मिळेल जो ऑटो- जनरेटेड असेल आणि तक्रार किंवा उपस्थित केलेल्या तक्रारीवर प्लॅटफॉर्म पॉलिसीज आणि सरकारी नियमांनुसार कारवाई केली जाईल.
  6. केलेल्या कारवाईचे सर्व तपशील आमच्या मासिक ट्रान्सपरन्सी अहवालात एकत्रित केले आहेत आणि ते शेअरचॅटवर https://help.sharechat.com/transparency-report येथे उपलब्ध आहे.

तुम्ही खालील पॉलीसीजच्या संदर्भात तक्रार अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता, किंवा तुमच्या खालील बाबींशी निगडित इतर कोणत्याही समस्या असू शकतात:
A. शेअरचॅट टर्म्स ऑफ सर्व्हिस
B. शेअरचॅट गोपनीयता पॉलिसी
C. तुमच्या खात्याबद्दलचे प्रश्न

डेटा सुरक्षितता, गोपनीयता आणि प्लॅटफॉर्म वापरासंबंधीच्या तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आमच्याकडे तक्रार अधिकारी आहे. तुम्ही उपस्थित केलेल्या समस्या आम्ही मिळाल्यापासून 15 (पंधरा) दिवसांच्या आत सोडवू. तुमच्यासाठी आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आम्ही एक पद्धत तयार केली आहे. तुम्ही खालीलपैकी कोणत्याही तक्रार अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता:

कु. हरलीन सेठी
पत्ता: मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड,
नॉर्थ टॉवर स्मार्टवर्क्स, वैष्णवी टेक पार्क,
सर्व्हे नं. १६/१ आणि नं. १७/२ गाव अमबलीपुरा, वरथूर हुबळी,
बंगळुरू शहर, कर्नाटक- ५६०१०३.
ईमेल: grievance@sharechat.co

नोट - कृपया वर नमूद केलेल्या ईमेलवर युजर्सशी संबंधित सर्व तक्रारी पाठवा. आमच्यासाठी समस्यांना प्रोसेस आणि त्यावर जलदगतीने निराकरण करण्यासाठी

नोडल संपर्क व्यक्ती - कु. हरलीन सेठी
ईमेल: nodalofficer@sharechat.co
नोट - हा ईमेल केवळ पोलिस आणि तपास यंत्रणांच्या वापरासाठी आहे. युजर्सशी संबंधित समस्यांसाठी हा योग्य ईमेल आयडी नाही. युजर्सशी संबंधित सर्व तक्रारींसाठी, कृपया आमच्याशी grievance@sharechat.co वर संपर्क साधा

उत्तरदायित्वावरील मर्यादा

आमच्या प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांच्या कृतीमुळे झालेल्या अटींच्या उल्लंघनाचे अथवा चुकीच्या व अधुऱ्या माहितीमुळे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे झालेल्या हानीचे कोणतेही उत्तरदायित्व आम्ही गृहीत धरत नाही.

आम्ही उपलब्ध करून दिलेला प्लॅटफॉर्म आणि सेवा या 'आहे तशा' आणि 'उपलब्ध असलेल्या' या प्रमाणावर त्याला कोणतीही हमी अथवा प्रतिनिधित्व नाही, आणि त्या लिखित स्वरूपात दिल्या असल्यासच त्या दर्शविल्या अथवा अवलंबिल्या जातील. आम्ही आपल्याला आमच्या सेवा अथवा प्लॅटफॉर्म आदींच्या गुणवत्तेची ज्यात अद्वितीय, समयोचित, सुरक्षित व त्रुटींविरहित सुविधा मिळण्याच्या तरतुदी आहेत: तसेच या सेवा प्रत्येक डिव्हाइससाठी अनुकूल असेल किंवा त्यातील त्रुटींमध्ये सुधारणा केली जाईल या सर्व गोष्टींची हमी देऊ शकत नाही.

कोणत्याही परिस्थितीत आम्ही किंवा आमचे कोणतेही सहयोगी, उत्तराधिकारी आणि नेमलेले अधिकारी आणि त्यांचे संबंधित गुंतवणूकदार, संचालक, अधिकारी, कर्मचारी, एजंट, सेवा प्रदाता आणि पुरवठादार हे दुसऱ्या वापरकर्त्याने किंवा सेवा व प्लॅटफॉर्मच्या वापरातून किंवा त्याच्यावर आधारित गोष्टींतून झालेल्या अटींच्या उल्लंघनातुन उद्भवलेल्या कोणत्याही विशेष, अपघाती, दंडात्मक, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अथवा परिणामकारक हाणींसाठी जबाबदार असणार नाही.

जर यातून वगळलेल्या कोणत्याही गोष्टी येथे कोणत्याही कारणास्तव अवैध ठरल्या आणि आम्ही किंवा आमची कोणतीही संबद्ध संस्था, अधिकारी, संचालक किंवा कर्मचारी या नुकसान किंवा हानीसाठी जबाबदार असतील तर अशा प्रकारचे उत्तरदायित्व शुल्क हे या दावा केलेल्या तारखेच्या मागील महिन्यापर्यंत आम्हाला देण्यात आलेल्या सेवा आणि प्लॅटफॉर्म वापराच्या रकमेइतके किंवा एका ठराविक रकमेपर्यंत मर्यादित असावे.

नुकसान भरपाई

आपण खालील पासून उद्भवलेले कोणत्याही प्रकारचे दावे, कार्यवाही, नुकसान, क्षति, दायित्व, किंमत, मागणी किंवा खर्च (अॅटर्नीच्या शुल्कासह परंतु त्यापुरतेच मर्यादित नाही) विरुद्ध आम्हाला आणि आमच्या सहाय्यक कंपन्या, सहयोगी आणि एजंट आणि त्यांचे संबंधित अधिकारी, संचालक, कर्मचारी, उत्तराधिकारी ह्यांना हानीरहित, सुरक्षित ठेवण्यास आणि नुकसान भरपाई देण्यास सहमत आहात: (i) तुमचा प्लॅटफॉर्म आणि सेवांकरिता प्रवेश किंवा वापर; (ii) तुमच्या द्वारे या कराराअंतर्गत तुमच्या दायित्वांचे उल्लंघन; (iii) तुमच्याद्वारे बौद्धिक संपत्तीचे कोणतेही उल्लंघन किंवा कोणत्याही गोपनीयता किंवा उपभोक्ता संरक्षण अधिकार समवेत कोणत्याही तृतीय पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन; (iv) कायद्याचे किंवा कंत्राटी बंधनांचे कोणतेही उल्लंघन आणि अशा उल्लंघनास अनुसरून कोणतेही दावे, मागण्या, सूचना; (v) आपली निष्काळजीपणा किंवा हेतुपुरस्सर गैरवर्तन. हे दायित्व आमच्या अटी संपुष्टात येईपर्यंत राहतील.

अवांछित साहित्य

आम्ही नेहमी तुमच्या पासून प्राप्त अभिप्राय किंवा अन्य सूचनांचे स्वागत करतो. आम्ही त्यांच्यासाठी नुकसानभरपाई देण्याच्या कोणत्याही निर्बंध किंवा बंधनाशिवाय ते वापरू शकतो आणि त्यांना गोपनीय ठेवण्यासाठी कोणत्याही बंधनाच्या अधीन नाही.

सामान्य

  1. जर या अटींचा कोणताही भाग लागू करणे शक्य नसेल तर उर्वरित परिणाम कायम राहतील.

  2. आमच्या अटींमध्ये केलेली कोणतीही दुरुस्ती किंवा सवलत लिखित स्वरूपात आणि आमच्या स्वाक्षरीसह असणे आवश्यक आहे.

  3. जर आम्ही या अटींच्या कोणत्याही पैलूची अंमलबजावणी करण्यास असमर्थ असलो, तर आमच्या अधिकारांची अंमलबजावणी न होणे म्हणजे आमच्याकडून आपल्याला काही सवलत देणे असे होणार नाही, ज्यांत योग्य कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याला अशा कोणत्याही बेकायदेशीर किंवा अपरिवर्तनीय कृत्यांचा रिपोर्ट करणे किंवा आपल्या प्रोफाईलला रोखणे किंवा निलंबित करणे समावेशित आहे.

  4. आम्ही आपल्याला स्पष्टपणे मंजूर न केलेले सर्व हक्क राखून ठेवतो.