गोपनीयता धोरण
Last updated: 31st August 2024
आम्ही (मोहल्ला टेक प्रा. लि.,किंवा "शेअरचॅट") ने समजून घेतले आहे की आपली गोपनीयता अतिशय महत्वाची आहे आणि तिला गंभीरपणे घेतले आहे. हे गोपनीयतेचे धोरण ("गोपनीयता धोरण") निर्धारित करते की आपण आमच्या वेबसाइटचा https://sharechat.com/ ("वेबसाइट") आणि / किंवा मोबाईल ऍप्लिकेशन 'शेअरचॅट' ("अनुप्रयोग") चा वापर करताना आम्ही आपला डेटा कसा गोळा, वापर आणि उघड करतो. या वेबसाइट आणि अॅप ला एकत्रितपणे "प्लॅटफॉर्म" म्हणून ओळखले जाते. "आम्ही", "आमचे" किंवा "आम्हाला" किंवा "कंपनी" च्या संदर्भात त्याचा अर्थ प्लॅटफॉर्म आणि / किंवा मोहल्ला टेकप्रा. लि. असेल. "आपण", "आपले" किंवा "वापरकर्ता" चा अर्थ आमच्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संस्था असेल. या गोपनीयता धोरणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे वगळता आम्ही आपली माहिती कोणासह किंवा कोणाबरोबर शेअर करणार नाही.
हे गोपनीयता धोरणहा शेअरचॅट चा भाग आहे आणि शेअरचॅट वापराच्या अटी ("अटी") आणि आमच्या शेअरचॅट कुकी धोरण सह वाचले जाते. हे प्लॅटफॉर्म वापरून, आपण या गोपनीयता धोरणाच्या अटी आणि शर्तींशी सहमत आहात. आपण आपली वैयक्तिक माहिती (खाली नमूद केल्याप्रमाणे) आमच्या गोपनीयता धोरणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे वापर आणि उघड करण्यासाठी देखील सहमती देता. या गोपनीयता धोरण मध्ये वापरलेले परंतु येथे परिभाषित न केलेले कॅपीटल शब्दांचा, तोच अर्थ असेल जो त्या अटींमध्ये अशा शब्दांना दिलेला आहे. जर आपण या गोपनीयता धोरणाच्या अटी आणि शर्तींशी सहमत नसाल, तर कृपया या प्लॅटफॉर्मचा वापर करू नका.
ती माहिती जी आम्ही एकत्रित करतो आणि आम्ही ती कशी वापरतो
खालील तक्त्यामध्ये आम्ही आपल्याकडून गोळा केलेली माहिती आणि आम्ही ती कशी वापरतो हे सूचीकृत केले आहे:
आम्ही संकलित करतो ती माहिती | आम्ही ती कसे वापरतो |
---|---|
लॉग इन डेटा. युजर ID, मोबाइल फोन नंबर, पासवर्ड, लिंग आणि IP एड्रेस. आम्ही एक सूचक वय श्रेणी गोळा करू शकतो जी आम्हाला सांगते की आपण आमच्या प्लॅटफॉर्मवर प्रविष्ट करण्यासाठी आणि आमच्या प्लॅटफॉर्मची (एकत्रितपणे, "लॉग-इन डेटा") काही वैशिष्ट्ये वापरण्यासाठी योग्य वयाचे आहात. अतिरिक्त प्रोफाइल माहिती. लॉग-इन डेटाच्या बरोबरीने, आम्ही आपल्या वापरकर्ता प्रोफाइलवर आपल्याद्वारे प्रदान केलेला आपला फोटो आणि आत्मकथा देखील संग्रहित करतो. आपण शेअर केलेले कंटेंट. यामध्ये आपण अन्य वापरकर्त्यांसाठी प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध केलेल्या सर्व माहितीचा समावेश होतो, जसे: - आपल्याबद्दल किंवा आपल्याशी संबंधित माहिती जी आपल्याद्वारे प्लॅटफॉर्मवर स्वेच्छेने शेअर केलेली आहे, ज्यांत कोणत्याही मर्यादेशिवाय, कोणतेही उद्धरण, प्रतिमा, राजकीय मते, धार्मिक विचार इ. देखील शामिल आहेत. - प्लॅटफॉर्मवर आपण करता ती कोणतीही पोस्ट (आपल्या सार्वजनिक प्रोफाइल, आपण प्लॅटफॉर्मच्या "माझा कट्टा" वैशिष्ट्यावर जी यादी तयार करता, आणि आपल्या डिव्हाइसच्या कॅमेर्या आणि/किंवा मायक्रोफोन सेन्सर द्वारे काढलेले फोटो, व्हिडिओ आणि व्हॉइस रेकॉर्डिंग आणि फोटो), इतरांकडून मिळालेल्या इतर कोणत्याही पोस्टिंग ह्या आपण पुन्हा पोस्ट करता आणि अशा पोस्टिंगशी संबद्ध स्थान डेटा आणि लॉग डेटा. यामध्ये आपल्याबद्दलची माहिती (स्थान डेटा आणि लॉग डेटासह) देखील समाविष्ट आहे जी प्लॅटफॉर्म चे इतर वापरकर्त्यांचे आपल्याबद्दल शेयर करतात किंवा आपल्याशी झालेले कोणतेही संवाद. ती माहिती जी आम्ही अन्य स्त्रोतांकडून प्राप्त करतो. आम्ही तृतीय पक्षांसह (उदाहरणार्थ, व्यवसाय भागीदार, तांत्रिक उप-कंत्राटदार, विश्लेषणात्मक पुरवठादार, शोध माहिती प्रदातेसह) कार्यरत असू शकतो आणि अशा स्त्रोतांकडून आपल्याबद्दल माहिती प्राप्त करू शकतो. हा डेटा आंतरिकपणे शेअर केला जाऊ शकतो आणि या प्लॅटफॉर्मवर एकत्रित केलेल्या लॉग डेटासह संयुक्त केला जाऊ शकतो. लॉग डेटा. "लॉग डेटा" ही माहिती अशी आहे जी आम्ही तेव्हा स्वयंचलितपणे संकलित करतो जेव्हा आपण प्लेटफॉर्मचा वापर करता, मग ती कुकीज, वेब बीकन्स, लॉग फाइल्स, स्क्रिप्ट्स, यासह असू शकते, परंतु ती खालील गोष्टीपुरता मर्यादित न रहाता असते: - तांत्रिक माहिती, जसे की आपली मोबाइल कॅरियर-संबंधित माहिती, आपल्या वेब ब्राउजरद्वारे उपलब्ध केलेली संरचना माहिती किंवा इतर प्रोग्राम्स जे आपण प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यासाठी वापरता, आपला IP एड्रेस आणि आपल्या डिव्हाइसची आवृत्ती आणि ओळख क्रमांक; - प्लॅटफॉर्म वापरुन आपण काय शोधले आहे आणि कोणत्या गोष्टी शोधल्या आहेत याविषयी माहितीप्लॅटफॉर्म वापरत असताना आपण वापरलेली वेब शोध अटी, भेट दिलेली सोशल मीडिया प्रोफाइल, वापरलेले मिनी अनुप्रयोग, आणि इतर माहितीचे विवरण आणि वापरलेली किंवा विनंती केलेली कंटेंट; - प्लॅटफॉर्म वर केलेल्या संवादाबद्दल सामान्य माहिती, जसे वापरकर्ताची ओळख ज्याच्या सोबत आपण संभाषण केले आहे, आणि आपल्या संभाषणाची वेळ, डेटा आणि कालावधी; आणि - मेटाडेटा, ज्याचा अर्थ आपण या प्लॅटफॉर्मद्वारे उपलब्ध केलेल्या बाबींशी संबंधित माहिती, जसे की शेअर केलेल्या छायाचित्र किंवा व्हिडिओ घेण्याचा किंवा पोस्ट करण्याचा दिनांक, वेळ किंवा स्थान. कुकीज. आमचे प्लॅटफॉर्म आपल्याला आमच्या प्लॅटफॉर्मच्या इतर वापरकर्त्यांपासून वेगळे करण्यासाठी कुकीज चा वापर करतो. हे आम्हाला आपणांस चांगला वापरकर्ता अनुभव देण्यास मदत करतात जेव्हा आपण आमचा प्लॅटफॉर्म ब्राउझ करता आणि ह्यांनी आम्हाला हा प्लॅटफॉर्म सुधारण्यास सोय होते. आम्ही आपल्या डिव्हाइसवरील कुकीजमधून कुकी डेटा गोळा करतो. आम्ही वापरत असलेले कुकीजबद्दल विस्तृत माहितीसाठी आणि ज्या उद्देशांसाठी आम्ही त्यांचा वापर करतो ते बघण्यासाठी आमचे कुकी धोरण पहा. सर्वेक्षण. आपण एखाद्या सर्वेक्षणात सहभागी होण्याचे निवडल्यास, आम्ही आपल्याला काही ठराविक वैयक्तिक माहिती देण्याची विनंती करू शकतो, जसे अशी कोणतीही माहिती जी तुम्हाला ओळखण्यासाठी वापरली जाऊ शकते ("व्यक्तिगत माहिती"). आम्ही हे सर्वेक्षण आयोजित करण्यासाठी तृतीय पक्ष सेवा प्रदात्याचा वापर करू शकतो आणि आपणाद्वारे हे सर्वेक्षण पूर्ण केल्यापूर्वी आपल्यास हे सूचित केले जाईल. | - प्लॅटफॉर्मवर सेट्प करण्यासाठी आणि वापरकर्ता खात्यामध्ये लॉग-इन करणे सोपे करण्यासाठी; - या गोपनीयता धोरणासह प्लॅटफॉर्ममधील बदलांविषयी आपल्याला सूचित करण्यासाठी; - वापरकर्ता मदतीच्या तरतूदीसमवेत संवादाची सुविधा देण्यासाठी; - आमचे नियम, अटी आणि धोरणे आणि आमचे कोणतेही अधिकार, किंवा आमच्या संलग्न कंपन्या, किंवा प्लॅटफॉर्मचे इतर वापरकर्तेचे अधिकार लागू करण्यासाठी; - नवीन सेवा विकसित करण्यासाठी आणि सध्याच्या सेवा आणि प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करण्यासाठी आणि वापरकर्ता अभिप्राय आणि विनंती एकत्र करण्यासाठी; - भाषा आणि स्थान आधारित वैयक्तिकरण प्रदान करण्यासाठी; प्लॅटफॉर्मचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि समस्यानिवारण, डेटा विश्लेषण, चाचणी, संशोधन, सुरक्षितता, फसवणूक-शोधणे, खाते व्यवस्थापन, आणि सर्वेक्षण हेतूसह आंतरिक संचालन करण्यासाठी; - आपण प्लॅटफॉर्मवर कसे प्रविष्ट होता आणि त्याचा वापर कसे करता हे नीट समजून घेण्यासाठी आणि प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासाठी; - "माझा कट्टा" आणि "लोकप्रिय" फीड्स कस्टमाईज करण्यासाठी; - वैयक्तिक माहिती सह आपल्या माहितीला टोपणनाव देण्यासाठी आणि तिला संकलित करण्यासाठी, आमचे वापरकर्ता प्लॅटफॉर्म कसे वापरत आहे हे अधिक चांगले समजून घेण्यासाठी क्षेत्र, फोन मॉडेल, ऑपरेटिंग सिस्टम प्लॅटफॉर्म, सिस्टीम लेंग्वेज आणि प्लॅटफॉर्म वर्जन या आयटमचे वापरकर्ता जनसांख्यिकीय विश्लेषण संचालित करण्यासाठी; - ते वैयक्तिक माहिती सह आपल्या माहितीला टोपणनाव देण्यासाठी आणि तिला संकलित करण्यासाठी, जेव्हा वापरकर्ते प्लॅटफॉर्मवर तृतीय-पक्षीय सेवांचा उपयोग करतात तेव्हा कोणती कंटेंट आणि सेवांचा वापर केला जातो याचे वेब चे संग्रहण आणि ट्रॅफिक आकडेवारी गणना करण्यासाठी; - जाहिरात आणि इतर मार्केटिंग आणि जाहिरातविषयक उपक्रमांची परिणामकारकता आणि सुधारणा करण्याकरिता मुल्यमापन करण्यासाठी. |
वापरकर्ता शोध डेटा. आपण प्लॅटफॉर्मवर केलेले कोणतेही शोध. | आपल्याला आपल्या मागील शोधांमध्ये द्रुत प्रवेश प्रदान करण्यासाठी. वैयक्तिकरणासाठी विश्लेषण वापरण्यासाठी आणि आपणांस लक्ष्यित जाहिराती दर्शविण्यासाठी. |
अतिरिक्त खाते सुरक्षा. आम्ही आपले फोन नंबर गोळा करतो आणि आपल्या फोनवर वन-टाइम-पासवर्ड "OTP" पाठवून आपल्या फोनवर SMS वर प्रवेश करण्याची विनंती करतो, जे आपण आमच्या प्लॅटफॉर्मवर नोंदणी करताना आपल्या ओळखीच्या पुष्टीकरणासाठी OTP प्रविष्ट करून पुष्टी करता. | आपल्या ओळखीची पडताळणी करण्यासाठी आणि आपल्या खात्याची सुरक्षितता राखण्यासाठी. |
चॅट डेटा. आपण जेव्हा प्लॅटफॉर्मवर कोणत्याही चॅट फीचरचा वापर करता तेव्हा आम्ही आपण आणि इतर वापरकर्त्यांदरम्यानच्या झालेल्या कोणत्याही संपर्काची कंटेंट एकत्रित करतो. हे आपल्या डिव्हाईसवर आणि त्या वापरकर्त्यांच्या डिव्हाईसवर सेव्ह होते ज्यांना आपण ते मॅसेज पाठविले आहे. तथापि, आम्ही आपल्या चॅट डेटावर लक्ष ठेवत नाही, आपल्या चॅट डेटाच्या आधारावर कोणतीही कृती करत नाही किंवा ती कोणत्याही तृतीय पक्षाकडे उघड करीत नाही. | दुसऱ्या वापरकर्त्याशी मॅसेजचे वितरण सुलभ करण्यासाठी. |
संपर्क सूची. आम्ही आपल्या मोबाईल डिव्हाइस वरील संपर्क यादीत प्रवेश करतो. आपल्या संपर्क यादीमध्ये प्रवेश करण्यापूर्वी आम्ही नेहमी आपली संमती मागतो आणि आपल्याकडे आपल्या संपर्क यादीचा प्रवेश नाकारण्यासाठी पर्याय उपलब्ध आहे. | आपल्याला "जोडा" आणि निमंत्रण पाठवा ह्या प्लॅटफॉर्मची वैशिष्ट्ये द्वारे इतर प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांसह जोडायला; |
स्थान माहिती. "स्थान डेटा" अशी माहिती आहे जी आपल्या GPS, IP ऍड्रेस आणि/किंवा सार्वजनिक पोस्ट्सद्वारे मिळविली जाते, ज्यामध्ये त्या स्थानाची माहिती असते. तुम्ही आम्हाला आणि प्लॅटफॉर्मच्या इतर वापरकर्त्यांना विशिष्ट स्थानाची माहिती उघड कराल: - जेव्हा आपण प्लॅटफॉर्मवर काही विशिष्ट स्थान-आधारित वैशिष्ट्ये वापरता, जसे ‘शेक न चॅट’ सुविधा आणि/किंवा इतर सुविधा किंवा मिनी ऍप्लिकेशन्स, जे आम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर वेळोवेळी टाकू शकतो, आणि जेव्हा आपण अन्य प्लॅटफॉर्म वापरकर्तासोबत आपले स्थान शेअर करता; आणि - जेव्हा आपण प्लॅटफॉर्म वर प्रवेश करता, तेव्हा आम्ही आपल्या IP एड्रेस, डिव्हाइस किंवा इंटरनेट सर्व्हिसवरून स्थान माहिती प्राप्त करतो, जेणेकरून आपल्या खात्यात एकाधिक किंवा फसव्या लॉग-इन प्रतिबंधित केल्या जातील. | सुरक्षा, फसवणूक-चौकशी आणि खाते व्यवस्थापनाकरिता (जसे की आपल्या खात्यावर कोणतेही एकाधिक लॉग-इन किंवा संशयास्पद लॉग-इन नाहीत याची खात्री करणे); आपल्याला आपण वापरण्यास निवडलेल्या स्थान-आधारित सेवा प्रदान करण्यासाठी: - जसे की शेक एन चॅट (या स्थान-आधारित सेवा आहेत ज्या आपण मर्यादित कालावधीसाठी आपले सामान्य स्थान उघडण्यासाठी वापरण्याचे निवडू शकता);- मिनी एप्लिकेशन वेळोवेळी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध केले जाऊ शकतात, ज्यासाठी त्यांनी प्रदान केलेल्या सेवांवर आधारित अशा माहितीची आवश्यकता असू शकते (जर आपण कोणत्याही मिनी एप्लिकेशनला आपले स्थान उघड करणे निवडले असेल); - न्यूज कॉर्नर (जर आपण या वैशिष्ट्यावर प्रवेश केला तर, आम्ही कदाचित आपल्यासाठी स्थानिक संबंधित बातम्या कंटेंट अनुकूल करण्यासाठी आपले स्थान वापरू शकतो); - भाषा आणि स्थान सानुकूलन प्रदान करण्यासाठी. |
ग्राहक समर्थन माहिती. अशी कोणतीही माहिती जी आपण कोणत्याही सहाय्य किंवा समर्थनासंबंधित आमच्या ग्राहक सहाय्य कार्यसंघाला प्रदान केली आहे, जिची आपल्याला आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करताना वेळोवेळी गरज पडू शकते. | आपल्या सहायता संबंधित समस्येची तपासणी करण्यासाठी. |
डिव्हाइस डेटा. "डिव्हाइस डेटा" अमर्यादितपणे, खालील गोष्टी समावेशित आहेत: § डिव्हाइस विशेषता: माहिती जसे ऑपरेटिंग सिस्टम, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आवृत्त्या, बॅटरी चा स्तर, सिग्नल ची शक्ती, उपलब्ध स्टोरेज जागा, ब्राउझर चा प्रकार, एप्लिकेशन आणि फाइल नावे आणि प्रकार, आणि प्लगिन. § डिव्हाइस ऑपरेशन्स: त्या डिव्हाइसवर केलेले ऑपरेशन आणि वर्तणुकीविषयी माहिती, जसे की विंडो फोरग्राउंडवर आहे किंवा बॅक ग्राउंडवर आहे. § ओळखकर्ता: युनिक आयडेंटिफायर्स, डिव्हाइस ID आणि इतर आयडेंटिफायर्स, जसे की आपण वापरत असलेल्या खेळ, अॅप्स किंवा खात्यांवरून. § डिव्हाइस सिग्नल: आम्ही आपले ब्ल्यूटूथ सिग्नल, आणि जवळपासच्या वाय-फाय प्रवेश बिंदू, बीकन आणि सेल टॉवर्स ची माहिती मिळवू शकतो. § डिव्हाइस सेटिंग्जमधून डेटा: आपण आम्हाला आपण चालू केलेल्या डिव्हाइस सेटिंग्जद्वारे प्राप्त करण्याची अनुमती देत असलेली माहिती, जसे की आपल्या GPS स्थान, कॅमेरा किंवा फोटोंपर्यंत प्रवेश. § नेटवर्क आणि कनेक्शन: माहिती, जसे की आपल्या मोबाइल ऑपरेटर किंवा ISP चे नाव, भाषा, टाईम झोन, मोबाइल फोन नंबर, IP ऍड्रेस आणि कनेक्शनची गती. § एप्लिकेशन: आपल्या मोबाइल डिव्हाइसवर संग्रहित केलेले कोणतेही मोबाइल एप्लिकेशन. § माध्यम: आम्ही आपल्या मोबाईल डिव्हाइसवरील मीडिया गॅलरीवर प्रवेश करतो, ज्यांत कोणत्याही मर्यादेशिवाय, इमेजेस, व्हिडिओ आणि ऑडिओ फायली आणि आपल्या फोनवरील स्टोरेज स्थान देखील समावेशित आहे. तरीही, आपल्या इमेजेस ऍक्सेस करण्यापूर्वी आम्ही आपली संमती प्राप्त करू आणि आपल्यास आम्हाला अशा प्रवेशास नकारण्याचा पर्याय असेल. | - प्लॅटफॉर्म वापरुन ऑडिओ, व्हिडिओ आणि इमेजेस यासारख्या मीडियाचे शेअरिंग सुलभ करण्यासाठी; - आमच्या प्लॅटफॉर्मशी आपला मोबाइल डिव्हाइस जुळविण्यासाठी; - व्हाट्सएप आणि/किंवा फेसबुकद्वारे शेअर करण्याच्या हेतूसाठी प्लॅटफॉर्मवरून कोणतीही कंटेंट डाउनलोड करण्यात सक्षम होण्यासाठी आपल्या डिव्हाइसवर पुरेशी साठवण जागा आहे किंवा नाही हे समजण्यासाठी; - आमच्या प्लॅटफॉर्मवर आपला वापरकर्ता अनुभव सर्वोत्तम करण्यासाठी; - आपल्या मोबाइल डिव्हाइसवर डाउनलोड केलेल्या एप्लिकेशनद्वारे प्लॅटफॉर्मवरील कोणत्याही कंटेंटचे शेयरिंग सोयीचे करण्यासाठी; - आपली ओळख सत्यापित करण्यासाठी, जेणेकरून आमच्या अटी, नियम आणि धोरणांची अंमलबजावणी करता येऊ शकेल; - हे प्लॅटफॉर्म उन्नत करण्यासाठी. |
संमती प्राप्त माहिती. अशी कोणतीही माहिती जी प्लेटफार्मवर वेळोवेळी देऊ केल्या जाणाऱ्या कोणत्याही स्पर्धेमध्ये प्रवेश करण्यासाठी आपण आम्हाला प्रदान करता. | - स्पर्धेत आपल्या सहभागास सुविधाजनक बनविण्यासाठी; - लागू असल्यास बक्षीस देण्यासाठी. |
आपल्या माहितीचा खुलासा
आम्ही आपली माहिती खालील पद्धतीने उघड करतोः
इतरांसाठी दृश्यमान कंटेंट
शोध इंजिनसह सार्वजनिक कंटेंट, म्हणजे असे कोणतीही कंटेंट जे आपण आपल्या वापरकर्ता प्रोफाइलवर किंवा दुसऱ्या वापरकर्त्याच्या प्रोफाइलवर पोस्ट करता, जसे की पोस्ट टिप्पणी, जी प्रत्येकासाठी प्रवेशयोग्य आहे. आपल्या प्रोफाइल पृष्ठ माहितीसह, प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यासाठी आपण जी काही माहिती स्वेच्छेने उघड करता अशी कोणतीही माहिती, जी कोणासाठीही प्रवेशयोग्य आहे. जेव्हा आपण असे कंटेंट जमा, पोस्ट किंवा शेअर करता जी आपण प्लॅटफॉर्मवर सार्वजनिक करण्यासाठी निवडली आहे, ते कंटेंट इतरांद्वारे पुन्हा शेअर केली जाऊ शकते.आपण हा विचार करावा की आपणाला ते कंटेंट कोणाशी शेअर करायची आहे, कारण जे लोक आमच्या प्लॅटफॉर्मवरील आपले क्रियाकलाप बघू शकतात ते आमच्या प्लॅटफॉर्मवर किंवा इतर ठिकाणी तिला इतरांसह शेअर करण्याचे ठरवू शकतात, ज्यांत त्या प्रेक्षकांचा देखील समावेश आहे ज्या लोकांसह आपण ती माहिती शेअर केली आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखादी पोस्ट शेयर करता किंवा आमचे प्लॅटफॉर्म किंवा खातीवरील विशिष्ट वापरकर्त्यांना संदेश पाठविता तेव्हा, ते आमच्या प्लॅटफॉर्मवर किंवा बाहेर इतर वापरकर्त्यांसह ते कंटेंट डाउनलोड किंवा री-शेअर करू शकतात. तसेच, आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पोस्टवर टिप्पणी देता किंवा त्यांच्या कंटेंटला लाईक करता तेव्हा आपली ही टिप्पणी किंवा लाईक इतर कोणालाही दृश्यमान असेल जो त्या व्यक्तीची कंटेंट बघू शकतो. कृपया आपण हे लक्षात घ्यावे की, तुम्हाला तुमचे प्रोफाइल प्रायव्हेट करण्याचा पर्यायदेखील उपलब्ध आहे जेणेकरून तुम्ही परवानगी दिलेले फॉलोअर्सच तुम्ही केलेल्या पोस्ट्स पाहता येतील. आपल्या प्लॅटफॉर्मवरील प्रायव्हेट शेअरचॅट फीचरबद्दल सविस्तर माहितीसाठी तुम्ही https://help.sharechat.com/faq/private-profile या लिंकवर जाऊन तेथील एफएक्यू सेक्शन पाहावे.
वापरकर्ते आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर असे कंटेंट तयार करण्यासाठी आणि आपल्या पसंतीच्या प्रेक्षकांसह शेयर करण्यासाठी देखील करू शकतात, जसे, आपला फोटो पोस्ट करणे किंवा त्यांच्या कोणत्याही पोस्टमध्ये आपल्याला टॅग करणे.आम्ही कोणत्याही सामाजिक मीडिया साइटवर किंवा इतर कोणत्याही ऑनलाइन किंवा ऑफलाइन प्लॅटफॉर्मवर सर्व सार्वजनिक कंटेंट शेअर करण्याचा अधिकार राखून ठेवतो. आम्ही कधीही या अटींमध्ये स्पष्टपणे प्रदान केल्याशिवाय, अनामित आधाराशिवाय तृतीय पक्षांना आपली वैयक्तिक माहिती भाड्याने देणार नाही किंवा तिची विक्री करणार नाही.
आमच्या ग्रुप ऑफ कंपनीसह शेअर करणे
आम्ही आपली वैयक्तिक माहिती आपल्या ग्रुपच्या कोणत्याही सदस्यासोबत शेअर करू शकतो. "ग्रुप" ही संज्ञा चा अर्थ कोणतीही व्यक्ती किंवा संस्था असेल जी आमच्याद्वारे नियंत्रित केली जाते, किंवा कोणतीही व्यक्ती किंवा संस्था जी आमच्या नियंत्रणाखाली आहे, किंवा कोणतीही व्यक्ती किंवा संस्था जी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आमच्यासोबत सामान्य नियंत्रणामध्ये आहे.
आपण इतरांसोबत काय शेअर करता
जेव्हा आपण कंटेंट शेअर करता आणि आमच्या प्लॅटफॉर्मचा वापर करून संप्रेषण करता तेव्हा आपण जे शेअर करता त्या साठी प्रेक्षक निवडता. उदाहरणार्थ, जेव्हा आपण आमच्या प्लॅटफॉर्मवरून फेसबुकवर कोणतीही कंटेंट पोस्ट करता तेव्हा आपण त्या पोस्टसाठी प्रेक्षकांची निवड करता, जसे की मित्र, मित्रांचा एखादा गट किंवा तुमचे सगळेच मित्र. त्याचप्रमाणे, आपण आमच्या प्लॅटफॉमवरील कंटेंट शेअर करण्यासाठी आपल्या मोबाइल डिव्हाइसवरील व्हाट्सएप किंवा अन्य कोणत्याही एप्लिकेशनचा वापर करता तेव्हा आपण हे निवडता की आपण ते कंटेंट कोणासह शेअर करावी. आपण अशा व्यक्ति (ज्या लोकांबरोबर आपण प्लॅटफॉर्मवर उपलब्ध शेअररण पर्याय, जसे की व्हाट्सएप किंवा फेसबुक, द्वारे कंटेंट शेअर करणे निवडता) सोबत शेयर केलेली माहिती ते कश्याप्रकारे आणि कोणत्या रीतीने वापरतात त्यावर आम्ही नियंत्रण ठेऊ शकत नाही आणि त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही.
तृतीय पक्षांसह शेअरींग
आम्ही खाली दिलेल्या लोकांसमवेत काही निवडक तिस-या पक्षांसह आपली माहिती (वैयक्तिक माहिती समवेत) शेअर करू शकतो:
व्यवसाय भागीदार, पुरवठादार आणि उप-कंत्राटदार ("संलग्न"). संलग्न या माहितीचा वापर सेवा आणि सहयोगींच्या स्वतःच्या सेवा प्रदान करण्यात, समजून घेण्यात आणि सुधारण्यात मदत करण्यासाठी करू शकतात.
जाहिरातदार आणि जाहिरात नेटवर्क ज्यात डेटा निवडण्याची आणि आपण आणि इतरांना संबंधित जाहिराती देण्याची आवश्यकता असते. आम्ही आमच्या जाहिरातदारांना ओळखण्यायोग्य व्यक्तींबद्दल माहिती उघड करीत नाही, परंतु आम्ही त्यांना आमच्या वापरकर्त्यांची एकूण माहिती प्रदान करू शकतो (उदाहरणार्थ, आम्ही त्यांना कळवू शकतो की कोणत्याही दिवशी दिलेल्या त्यांच्या जाहिरातीवर कोणत्या निर्दिष्ट गटातील किती महिलांनी क्लिक केले आहे). आम्ही अशा एकूण माहितीचा उपयोग जाहिरातदारांना त्यांच्या आवडीच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात मदत करण्यासाठी देखील करु शकतो.
सरकारी संस्था किंवा कायद्याची अंमलबजावणी संस्था, जर आपल्याला विश्वास असेल की कोणत्याही कायदेशीर जबाबदारीचे किंवा कोणत्याही सरकारी विनंतीचे पालन करण्यासाठी आपला वैयक्तिक डेटा किंवा माहिती शेअर करणे आवश्यक आहे; किंवा अधिकारांचे संरक्षण करणे किंवा मालमत्तेचे कोणतेही नुकसान टाळण्यासाठी, किंवा कंपनी, आमचे ग्राहक किंवा लोकांचे रक्षण करण्यासाठी; किंवा सार्वजनिक सुरक्षितता, फसवणूक, सुरक्षितता किंवा तांत्रिक समस्या शोधणे, प्रतिबंध करणे किंवा अन्यथा संबोधित करण्यासाठी.
आम्ही खालील परिस्थितीत निवडक तृतीय पक्षासाठी आपली माहिती (वैयक्तिक माहिती समवेत) उघड करू शकतो:
जर कंपनी किंवा तिची सर्व मालमत्ता तिसऱ्या पक्षाद्वारे प्राप्त केली गेली असेल, तर त्या बाबतीत त्याच्या ग्राहकांबद्दल त्याच्या वैयक्तिक डेटाची माहिती एक हस्तांतरणीय संपत्ती असेल.जर आम्ही विलीनीकरण, अधिग्रहण, दिवाळखोरी, पुनर्गठन किंवा मालमत्तांची विक्री करत असू, जसे की आपली माहिती हस्तांतरीत केली जाईल किंवा वेगळ्या गोपनीयता धोरणेच्या अधीन राहील, तर आम्ही आपल्याला तसे आगाऊ सूचित करू, जेणेकरून आपण स्थानांतरण करण्यापूर्वी आपल्या खात्याला डिलीट करून अश्या कोणत्याही नवीन धोरणातून बाहेर पडण्याचा पर्याय निवडू शकता.
आमच्या अटी लागू करण्यासाठी आणि/किंवा अन्य करार.
सुरक्षा पद्धती
आम्ही एकत्रित केलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य तांत्रिक आणि सुरक्षा उपाययोजना करतो. जिथे आम्ही आपल्याला (किंवा आपण जिथे निवड केली आहे) एक युजरनेम आणि पासवर्ड प्रदान केलेला आहे, ज्याने आपण प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यास सक्षम होता, तिथे हे तपशील गोपनीय ठेवण्यासाठी आपण जबाबदार आहात. आम्ही आपल्याला कोणाबरोबर आपला पासवर्ड शेअर न करण्यास सांगतो.
आम्ही आपली वैयक्तिक माहिती कुठे ठेवतो
आम्ही आपला डेटा ऍमेझॉन वेब सर्व्हिसेस इंक. द्वारे प्रदान केलेल्या ऍमेझॉन वेब सर्व्हिसेस क्लाऊड प्लॅटफॉर्म, सह संचयित करतो (मुख्यालय 410 टेरी अॅव्ह्यु. एन सिएटल, वॉशिंग्टन 98109, यूएसए)आणि गुगल LLC द्वारे प्रदान केलेल्या गुगल क्लाऊड प्लॅटफॉर्मवर (ज्याचे मुख्यालय1101 एस फ्लॉवर सेंट, बरबँक, कॅलिफोर्निया, 91502, यूएसए मध्ये आहे) भारत आणि परदेशात स्थित त्यांच्या सर्व्हरवर देखील स्टोर करतो. ऍमेझॉन वेब सेवा आणि गुगल क्लाउड प्लॅटफॉर्म दोघेहीमाहितीची हानी, गैरवापर आणि बदल घडवून आणण्यासाठी सुरक्षा उपाय लागू करतात, ज्याचे तपशील https://aws.amazon.com/ आणि https://cloud.google.com वर उपलब्ध आहेत ऍमेझॉन वेब सर्व्हिसेस आणि गुगल क्लाऊड प्लॅटफॉर्म ने स्वीकारलेल्या गोपनीयता धोरणे https://aws.amazon.com/privacy/?nc1=f_pr आणि https://policies.google.com/privacy येथे उपलब्ध आहेत.
या धोरणामध्ये बदल
कंपनी वेळोवेळी ही गोपनीयता धोरण अपडेट करू शकते. जेव्हाही आम्ही या गोपनीयता धोरणामध्ये मध्ये कोणतेही बदल करू जे आपल्याला जाणणे महत्त्वाचे आहे तेव्हा आम्ही या लिंकवर अपडेट केलेले गोपनीयता धोरण पोस्ट करू. या गोपनीयता धोरणात केलेले कोणतेही बदल लक्षात घेण्यासाठी हे पृष्ठ वेळोवेळी तपासत ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.
घोषणा
दुर्भाग्याने, इंटरनेट द्वारे माहिती प्रसारित करणे पूर्णपणे सुरक्षित नाही. जरी आम्ही आपली व्यक्तिगत माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी जास्तीत जास्ती प्रयत्न करू, तरी आम्ही प्लॅटफॉर्मवर प्रसारित केलेल्या आपल्या डेटा च्या सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही; केलेला कोणताही प्रसार आपल्या स्वत:च्या जोखमीवर असेल. आम्हाला आपली माहिती प्राप्त झाली की अनधिकृत प्रवेश टाळण्यासाठी आम्ही कठोर प्रक्रिया आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये वापरणार आहोत.
आपले अधिकार
तुम्ही तुमचा कंटेंट तुमच्या अकाउंट / प्रोफाइल यांवरून आणि तुमचे अकाउंट / प्रोफाइल हेदेखील कोणत्याही क्षणी डिलीट करण्यासाठी स्वतंत्र आहात. तथापि, तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर केलेल्या क्रिया अथवा अकाऊंटची माहिती आमच्या डेटा संग्रह धोरणांनुसार आमच्यासाठी उपलब्ध असेल ज्यामध्ये आम्ही तुमचा कंटेंट आणि अकाउंट कधी डिलीट केले याचीही माहिती असेल.
तुम्ही कधीही लॉगिन करून अथवा तुमच्या प्रोफाइल पेजवर जाऊन तुमच्या अकाउंटवरील वैयक्तिक माहितीत सुधार, बदल अथवा ती डिलीट करू शकता. उल्लेख केल्याप्रमाणे, आपल्याला संदेशातील सूचनांचे पालन करून आम्हांकडून नको असलेल्या ई-मेल संवादांपासून बाहेर पडता येईल. तथापि, आपल्या खात्याचे हटवले जावेपर्यंत, आपण सर्व प्रणाली ई-मेल प्राप्त करत राहाल. माहिती तंत्रज्ञान (योग्य सुरक्षा प्रथांचा आणि पद्धतींचा आणि संवेदनशील वैयक्तिक डेटा किंवा माहितीचा) नियम, 2011 च्या कलम 5(6) ("नियम") अंतर्गत, आपण कधीही आम्ही एकत्रित केलेल्या माहितीचे पुनरावलोकन, सुधारणा आणि संपादन करण्याचा अधिकार राखता. नियमांच्या कलम 5(7) अंतर्गत, आपल्याला आपल्या माहितीच्या संकलनावर आपल्या संमतीला रद्द करण्याचा अधिकार देखील आहे. तथापि, कृपया लक्षात घ्या की आपली संमती रद्द करणे आपल्या प्लॅटफॉर्म वापरावर नकारात्मक प्रभाव टाकू शकते. उदाहरणार्थ, आपल्याला आपल्या मोबाइल डिव्हाइसच्या मीडिया फोल्डर आणि कॅमेऱ्याचा प्रवेश आवश्यक आहे, ज्यामुळे आपण आपल्या मोबाइल डिव्हाइसवरून चित्रे क्लिक करून प्लॅटफॉर्मवर पोस्ट करू शकता, जी सुविधा आपल्याला उपलब्ध होणार नाही जर आपण आम्हाला असे प्रवेश प्रदान केले नाही. आपण आमच्याकडे मार्केटिंग उद्देशासाठी आपली वैयक्तिक माहितीचा वापर न करण्याची विनंती देखील करू शकता. आपण या अधिकारांचा उपयोग कधीही grievance@sharechat.co वर संपर्क करून करू शकता. तथापि, आपल्या कोणत्याही विनंतीची पूर्तता करण्यासाठी आम्हाला 30 (तीस) दिवसांची योग्य वेळ लागेल. त्याशिवाय, आपल्या खात्याला प्लॅटफॉर्मवरून काढण्यासाठी आणि वापरकर्ता डेटा काढण्यासाठी, कृपया आपल्या अॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन 'अकाउंट हटवा' पर्यायावर क्लिक करा. अधिक माहितीसाठी, कृपया अकाउंट हटविणे बाबतचे FAQ आणि डेटा संग्रह धोरणे पाहा.
डेटा धारणा
आम्ही तुमची महत्त्वाची वैयक्तिक माहिती (खालील परिच्छेदात उल्लेखलेली) ज्या उद्देशांसाठी त्या माहितीचा कायदेशीर वापर केला जाऊ शकतो त्यापेक्षा जास्त काळ ठेवत नाही. प्लॅटफॉर्मवर तुम्ही तयार केलेले इतर कोणतेही व्हिडिओ/इमेज अपलोड केल्याच्या तारखेपासून 180 दिवसांपर्यंत साठवले जातील.180 दिवस संपल्यानंतर, अशा प्रकारचा युजरनिर्मित कंटेंट प्लॅटफॉर्मवरून आपोआप हटविला जाईल. तथापि, ठराविक तृतीय पक्षांसोबतच्या कराराच्या कामगिरीसाठी, प्लॅटफॉर्मचे व्यावसायिक हेतू, प्लॅटफॉर्मवर ऑफर केलेल्या उत्पादनांची तरतूद आणि लागू कायद्याचे पालन करण्यासाठी, आम्ही तुमचा ठराविक कंटेंट 180 दिवसांच्या प्रतिधारणाच्या कालावधीनंतरही राखून ठेवू शकतो. तुमचा कंटेंट तुम्हाला 180 दिवस संग्रह कालावधी नंतरही पाहता यावा यासाठी तुम्ही स्वतः त्या कंटेंटच्या अधिक प्रतींची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल . तुम्ही तुमचे अकाउंट डिलीट करण्याचा पर्यायही निवडू शकता. पुढे तुमचे अकाउंट तुमच्या निष्क्रियतेमुळे आपोआप डीलीट होईल . त्याचप्रमाणे प्लॅटफॉर्मवरील सार्वजनिक कंटेंटच्या बनविण्यात आलेल्या प्रती आणि त्याबाबतची दुसऱ्या युजर्सकडून साठवली गेलेली माहिती आमच्या सिस्टीममध्ये साठवल्या गेल्या असतील ज्यामध्ये प्लॅटफॉर्मवरील कॅशे आणि अर्काइव्हस यांचाही समावेश असेल. याव्यतिरिक्त, इंटरनेटच्या स्वरूपामुळे, आम्ही/तुम्ही तुमच्या खात्यातून काढून टाकलेला किंवा हटविलेला कंटेंट, तुमच्या कंटेंटच्या तर प्रती इंटरनेटवर इतरत्रही असू शकतात आणि अनिश्चित काळासाठी ठेवल्या जाऊ शकतात. कायद्याच्या नियम ३ अनुसार "संवेदनशील / अति महत्त्वाची" अशी वर्गवारी करण्यात आलेली इतर माहिती आणि पासवार्ड्स म्हणजे युजर्सची 'संवेदनशील / अति - महत्त्वाची माहिती ' असे समजावे .
तृतीय पक्ष लिंकः
या प्लॅटफॉर्मवर आमच्या भागीदार नेटवर्क, जाहिरातदार, संबद्ध आणि/किंवा इतर कोणत्याही वेबसाइट्स किंवा मोबाईल एप्लिकेशनच्या वेबसाइटला आणि कडून वेळोवेळी लिंक असू शकतात. जर आपण या पैकी कोणत्याही वेबसाईटसच्या लिंकचे अनुसरण केले तर, कृपया नोंद घ्या की ह्या वेबसाइट्सची स्वतःची गोपनीयता धोरणे आहेत आणि आम्ही या धोरणांसाठी कोणतीही जबाबदारी किंवा दायित्व स्वीकारत नाही. या वेबसाइट्स किंवा मोबाइल एप्लिकेशनवर आपला कोणताही वैयक्तिक डेटा सबमिट करण्यापूर्वी कृपया ही धोरणे तपासून घ्या.
तृतीय-पक्ष जोडणे / ऍम्बेड्स
तृतीय-पक्ष जोडणे / ऍम्बेड्स काय आहेत?
प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेले काही कंटेंट प्लॅटफॉर्मद्वारे होस्ट केली जात नाही. हे "ऍम्बेड्स" एका तृतीय-पक्षद्वारे होस्ट केलेल्या आणि प्लॅटफॉर्ममध्ये ऍम्बेड केलेल्या असतात. उदाहरणार्थ: युट्युब किंवा विमिओ व्हिडिओ, इमगुर किंवा गीफी जिफ्स, साउंडक्लाऊड ऑडिओ फायल, ट्विटर टि्वट्स किंवा स्क्राइब्ड डॉक्युमेंट जे प्लॅटफॉर्मवर पोस्टमध्ये दिसतात. ह्या फाईल्स होस्ट केलेल्या साइटला डेटा पाठवितात जसे की आपण त्या साईटला प्रत्यक्ष भेट देत होता (उदाहरणार्थ, जेव्हा आपण एका युट्युब व्हिडिओसह प्लॅटफॉर्म पोस्ट पृष्ठ लोड करता, तेव्हा युट्युब आपल्या क्रियाकलापांबद्दल डेटा प्राप्त करतो).
तृतीय पक्ष ऍम्बेड्ससह गोपनीयता विचार
हा प्लॅटफॉर्म तृतीय पक्षांद्वारे कोणता डेटा एकत्रित केला जाणार आहे किंवा ते त्याच्या सोबत काय करणार आहे हे नियंत्रित करत नाही. म्हणून या प्लॅटफॉर्मवरील तृतीय पक्ष ऍम्बेड्स या गोपनीयता धोरणाद्वारे समाविष्ट होत नाहीत. ते तृतीय-पक्ष सेवेच्या गोपनीयता धोरणानुसार समाविष्ट केले जातात. अशा एम्बेड किंवा API सेवांचा वापर केल्याने, तुम्ही थर्ड पार्टी सेवा अटींना बांधील असण्यास सहमती देता.
तृतीय पक्ष एम्बेड आणि API सेवांच्या वापरासाठी लागू असलेल्या तृतीय-पक्ष धोरणांची सूची:
कृपया प्लॅटफॉर्मवर वापरल्या जाणार्या वर्तमान तृतीय पक्ष API सेवांची यादी खालीलप्रमाणे (ही यादी संपूर्ण नाही):
- YouTube API सेवा या पुढील धोरणांद्वारे नियंत्रित केल्या जातात : https://www.youtube.com/t/terms
- Snap Inc. सेवा या पुढील सेवा अटींद्वारे संचालित केल्या जातात : https://snap.com/en-US/terms
या धोरणांचा अवलंब करताना कोणताही विरोध किंवा विसंगती आल्यास, अशा तृतीय पक्षांच्या सेवा अटी तृतीय पक्षाच्या उत्पादन/सेवांच्या वापरावर नियंत्रण ठेवतील आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आशयावर आणि MTPL द्वारे प्रदान केलेल्या सेवांवर येथे उपलब्ध असलेली MTPL प्लॅटफॉर्म धोरणे नियंत्रण ठेवतील.
तृतीय पक्ष ऍम्बेड्ससह व्यक्तिगत माहिती शेयर करणे
काही एम्बेड्स फॉर्मद्वारे तुम्हाला वैयक्तिक माहिती देण्यासाठी विचारू शकतात, जसे की आपला ईमेल एड्रेस. आम्ही प्लॅटफॉर्मपासून खराब कृतींना दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. तथापि, जर आपण ह्या पद्धतीने आपली माहिती एका तृतीय पक्षाकडे सादर करणे निवडत असाल, तर आम्हाला माहीत नाही की ते त्या सोबत काय करतील. वर वर्णन केल्याप्रमाणे, त्यांच्या कृती या गोपनीयता धोरणात समाविष्ट नाहीत. म्हणून, जेव्हा प्लॅटफॉर्मवरील एम्बेड केलेले फॉर्म आपणांस आपला ईमेल एड्रेस किंवा इतर वैयक्तिक माहिती विचारत असतील तेव्हा सावध रहा. हे निश्चितपणे समजून घ्या की आपण आपली माहिती कोणास सादर करीत आहात. आणि ते तिच्या सोबत काय करणार आहेत त्याबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे. आपण असे सुचवितो की आपण आपली वैयक्तिक माहिती एखाद्या एम्बेडेड फॉर्मद्वारे कोणत्याही तृतीय-पक्षांना सादर करू नका.
आपली स्वतःची तृतीय पक्ष एम्बेड तयार करणे
जर आपण एक फॉर्म एम्बेड करता जो वापरकर्त्यांद्वारे वैयक्तिक माहितीचे सबमिशन करण्याची परवानगी देतो, तर आपल्याला एम्बेडेड फॉर्म जवळ लागू असलेल्या गोपनीयता धोरणाची एक प्रमुख लिंक प्रदान करणे आवश्यक आहे जी स्पष्टपणे सांगते की आपण जी माहिती गोळा केली आहे आपला हेतू तिचा वापर कसा करायचा आहे. तसे करण्यास अयशस्वी झाल्यास कंपनी ती पोस्ट अक्षम करू शकते, किंवा आपल्या खात्यावर मर्यादा घालू शकते, किंवा इतर कारवाई करू शकते.
आमच्याकडून कम्युनिकेशन्स
आम्ही वेळोवेळी आपल्याला सेवे-संबंधित घोषणा पाठवू शकतो जेव्हा आम्हाला असे करणे आवश्यक वाटते (जसे की आम्ही तात्पुरते देखभाल, किंवा सुरक्षा, गोपनीयता किंवा प्रशासकीय-संबंधित संप्रेषणासाठी प्लॅटफॉर्म निलंबित करतो). हे तुम्हाला आम्ही SMS द्वारे पाठवितो. आपण या सेवे-संबंधित घोषणांची निवड रद्द करू शकत नाही, जे प्रचारासाठी नसून केवळ आपल्या खात्याचे संरक्षण करण्यासाठी आणि तुम्हाला प्लॅटफॉर्मवर केलेल्या महत्वाच्या बदलांची माहिती देण्यासाठी वापरली जाते.
तक्रार अधिकारी
शेअरचॅट मध्ये डेटा सुरक्षा, गोपनीयता आणि प्लॅटफॉर्म वापर संबंधी चिंताबद्दल आपल्या तक्रारीच्या निवारणासाठी तक्रार निवारण अधिकारी आहे. आम्ही ते प्राप्त झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत आपण उठवलेल्या समस्यांचे निराकरण करू. आपण खालीलपैकी कोणत्याही एका तक्रार अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता:
नाव: श्रीमती हरलीन सेठी
पत्ता: मोहल्ला टेक प्रायव्हेट लिमिटेड,
नॉर्थ टॉवर स्मार्टवर्क्स, वैष्णवी टेक पार्क,
सर्व्हे नं. १६/१ आणि नं. १७/२ गाव अमबलीपुरा, वरथूर हुबळी,
बंगळुरू शहर, कर्नाटक- ५६०१०३.
कार्यालयीन तास: सोमवार ते शुक्रवार सकाळी 10:00 ते दुपारी 1:00 वाजे पर्यंत.
ईमेल: grievance@sharechat.co
नोट - कृपया आपण वापरकर्त्याशी संबंधित सर्व तक्रारी वर उल्लेख केलेल्या ईमेलवरच पाठवाव्यात, जेणेकरून आम्हाला त्यावर लवकरात लवकर कारवाई करता येईल आणि त्या तक्रारी सोडवता येतील.
नोडल संपर्क अधिकारी: श्रीमती हरलीन सेठी
ईमेल: nodalofficer@sharechat.co
कृपया याची नोंद घ्यावी - हा ईमेल हा फक्त पोलीस आणि तपास संस्थांच्या वापरासाठी आहे. ऍप वापरकर्त्यांशी संबंधित सर्व तक्रारींसाठी आपण आमच्याशी grievance@sharechat.co या ईमेलद्वारे संपर्क साधू शकता.